शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांची कामे जूनअखेरपर्यंत मंजूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:17 IST

रवींद्र चव्हाणांची आयुक्तांना सूचना : कामे होत नसल्याबाबत भाजप नगरसेवकांनी केल्या होत्या तक्रारी

कल्याण : प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागातील विकासकामांसाठी एक कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. मात्र, मंजुरीच मिळत नसल्याने ही कामे होत नसल्याने भाजपच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी आयुक्त गोविंद बोडके यांच्यासोबत बैठक घेऊ न नगरसेवकांची कामे जूनअखेरपर्यंत मंजूर करण्याचे आदेश दिले.

भाजपचे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी सभापती असताना २०१८ या वर्षात ‘परिशिष्ट अ’ तयार करून प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात एक कोटीची कामे प्रस्तावित केली होती. महापालिकेत निवडून आलेले १२२ सदस्य आणि पाच स्वीकृत सदस्य मिळून १२७ सदस्यांसाठी १२७ कोटींची कामे सुचवली गेली होती. त्यापैकी केवळ १५ कोटींची कामे मंजूर होऊन त्याचे बिल काढले गेले आहे. उर्वरित १२२ सदस्यांच्या प्रभागातील एक कोटी खर्चाची कामे मंजूर झालेली नाहीत. वर्ष उलटून गेले तरी हे काम मार्गी लावले जात नसल्याची तक्रार नगरसेवकांनी चव्हाण यांच्याकडे केली होती. चव्हाण यांनी ज्या नगरसेवकांची कामे मंजूर झालेली नाहीत, त्या सर्वांची कामे जूनअखेरपर्यंत मंजूर करावीत, असे आयुक्तांना आदेश दिले आहेत.

आचारसंहिता असल्याने मंजुरी रखडली होती, हे राज्यमंत्र्यांनी मान्य केले. मात्र, आता मंजुरीस कोणताही अडथळा नाही, असे ते म्हणाले.लेखा विभाग व लेखापरीक्षण विभागाकडून सदस्यांच्या कामांसाठी आडकाठी केली जाते. विशेष म्हणजे, आयुक्त, लेखा अधिकारी व लेखापरीक्षक यांच्यात वाद व संघर्षाचे वातावरण असल्याने त्याचा फटका सदस्यांना बसला आहे. सदस्यांना नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संघर्ष टाळून एकमेकांमध्ये समन्वय ठेवून सदस्यांची विकासकामे मार्गी लावावीत, अशी सूचना चव्हाण यांनी दिली. या बैठकीस भाजपचे माजी सभापती राहुल दामले, गटनेते विकास म्हात्रे, स्वीकृत सदस्य राजन सामंत, दया गायकवाड, संदीप पुराणिक, नगरसेविका रेखा चौधरी आदी उपस्थित होते.

सूतिकागृहाच्या इमारतीचे काम सुरू करा!डोंबिवलीतील सूतिकागृहासाठी पाच कोटींचा निधी मंजूर आहे. हे सूतिकागृह पीपीपी तत्त्वावर देण्याऐवजी पाच कोटींच्या निधीतून जितके होईल, तितके इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात यावे. तसेच जुनी इमारत पाडण्यात यावी. पडक्या इमारतीत बेकायदेशीर उद्योग सुरू आहे. त्याला आळा बसेल. याची काळजी महापालिकेने घ्यावी.

महापालिकेस ९० वैद्यकीय पदांना मंजुरी आहे. पगार कमी मिळत असल्याने डॉक्टर महापालिकेच्या रुग्णालयात सेवा देण्यास इच्छुक नाहीत. अनेक विशेष डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. ही पदे कंत्राटी पद्धतीने जास्त पगार देऊन भरण्याविषयी विचार करण्यात यावा. तसेच त्यासाठी डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मदत घ्यावी. डोंबिवली पश्चिमेतील मच्छी मार्केटच्या कामाचे कार्यादेश तातडीने काढण्यात यावेत.