शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

फोटो एकच, नावे वेगळी; १४१ सिमकार्डांची विक्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2023 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरा रोड : एकच फोटो, मात्र नाव आणि पत्ते वेगवेगळे वापरून तब्बल १४१ सिमकार्ड विक्री केल्याप्रकरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : एकच फोटो, मात्र नाव आणि पत्ते वेगवेगळे वापरून तब्बल १४१ सिमकार्ड विक्री केल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी भाईंदर पूर्वेच्या दोन सिमकार्ड विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. बनावट फोटो व कागदपत्रांच्या आधारे ही सिमकार्ड वापरात आली आहेत. 

केंद्र सरकारच्या दूरसंचार व दुरभाष्य संवाद विभागच्या वरिष्ठ उप महानिर्देशकांच्या साकीनाका  कार्यालयातून बोलावणे आल्यावर मीरा भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या सायबर शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष चव्हाण हे १६ मे रोजीच्या बैठकीसाठी गेले होते. या कार्यालयाने सिमकार्ड विक्रीबाबत केलेल्या तपासणीत काही सिमकार्ड विक्रेत्यांनी एकाच फोटोचा वापर करून वेगवेगळ्या नावे व पत्ता असलेल्या कागदपत्राद्वारे  सिमकार्ड चालू करून ती विक्री केली असल्याचे आढळल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. सायबर शाखेने नवघर पोलिस ठाण्यात २० मे रोजी भाईंदर पूर्वेचे रामदेव कलेक्शन व ओम मोबाइलवर गुन्हा दाखल केला आहे.