शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सलून व्यावसायिकाची आत्महत्या, खंडणीखोरांना कठोर शिक्षा व्हावी: आयुक्तांना साकडे

By जितेंद्र कालेकर | Updated: February 6, 2023 21:24 IST

मुंबई ठाण्यातील नाभिक समाज एकवटला: कुटूंबीयांना आर्थिक मदतीचीही मागणी

ठाणे: एका खंडणीखोरांच्या टोळीला कंटाळून सलून व्यावसायिक मनिष शर्मा यांनी आत्महत्या केल्याची घटना लोकमान्यनगर येथे अलिकडेच घडली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच खंडणीखोर आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी मुंबई ठाण्यातील नाभिक संघटनेच्या व्यावसायिकांनी बहुसंख्येने एकत्र येत सोमवारी पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. दरम्यान, आपल्या मागण्यांचे निवेदन या संघटनेने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनाही दिले.

पोलिस आयुक्त जयजित सिंग, जिल्हाधिकारी आणि वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांना नाभिक संघटनेने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, लोकमान्यनगर येथील स्थानिक सलून व्यावसायिक शर्मा यांनी खंडणीखोर गुंडांच्या त्रासाला कंटाळून ३१ जानेवारी २०२३ रोजी आपल्या दुकानातच आत्महत्या केल्यामुळे त्यांचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे. या घटनेतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी उर्वरित अन्य एका आरोपीलाही अटक करुन सर्वांवर  कडक कारवाई केली जावी. दिवसेंदिवस राज्यभरात शांत,संयमी सलून व्यवसायिकांवरील हल्ले आणि समाजकंटकांचा त्रास वाढत आहे. सरकारने अशा अनिष्ट  प्रवृत्तींना वेळीच आवर घालून कडक उपाययोजना करावी आणि सलून व्यवसायिक कै.मनिष शर्मा यांच्या कुटुंबियांना न्याय व शासकीय सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली.  

राज्यभरातून ४०० व्यावसायिकांची उपस्थिती-यावेळी मुंबई, ठाणे जिल्ह्यासह पालघर, पुणे, नगर ,उत्तर प्रदेश, राजस्थान येथूनही नाभिक संघटनांचे ४०० प्रतिनिधी या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी जननायक करपुरी ठाकूर समाज, सविता संघ, संत सेना पुरोगामी संघ ,डोंबिवली नाभिक संघ, पालघर नाभिक संघ, जनसेवा राष्ट्रीय पक्ष, स्वतंत्र मजदुर युनियन, एस बी पी बदलापूर शाखा, एसबीपी महाराष्ट्र कोर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. असोसिएशनचे कायदे सल्लागार शैलेश कदम यांच्यासह  महाराष्ट्र अध्यक्ष  दीपक यादव, संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण असोसिएशनचे महाराष्ट्र प्रभारी उदय टक्के यांनी अरुण जाधव, माधव गडेकर, संजय पंडित, सचिन कुटे,  विलास साळुंखे आदींनी मार्गदर्शन केले. दरम्यान, शर्मा आत्महत्या प्रकरणात सचिन मयेकर, धीरज वीरकर, जय परब, रोहित गंगणे आणि चेतन पाटील अशा पाच जणांना अटक केली असून उर्वरित वैभव विरकर याचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.