शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

जव्हार मध्ये उबदार कपड्यांची विक्री जोरात, गुलाबी थंडीचा मौसम सुरू

By admin | Updated: November 16, 2016 16:59 IST

सध्या 500 व 1000 च्या चलनी नोटा बंद झालेल्या असुन खेडोपाड्यातील बांधव आप आपल्यानोटांचे बदल व भरणा करण्यासाठी लांब लांब रांगेत ताटकळत उभे राहून पैसे बदलून घेत आहेत

चलनी नोटांवर मात करीत उबदार कपड्यांची खरेदी सुरूजव्हार - सध्या 500 व 1000 च्या चलनी नोटा बंद झालेल्या असुन खेडोपाड्यातील बांधव आप आपल्यानोटांचे बदल व भरणा करण्यासाठी लांब लांब रांगेत ताटकळत उभे राहून पैसे बदलून घेत आहेत. यामुळे बाजारात मात्र ईतर विक्री व्यावहार पुर्णपणे ठप्प असुन खाय-प्यायाच्या वस्तू ऐवजी कुठलीही वस्तू विक्री जात नाही, परंतू थंडीचा जोर वाढल्याने खेडोपाड्यातील गरीब आदिवासी बांधव मात्र उबदार कपडे व स्वेटर खरेदी करतांना दिसत आहेत.पालघर जिह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून आणि पर्यटन स्थळ व एैतिहासीक वारसा लाभलेल्या जव्हार शहरात गुलाबी थंडीची लहर सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासुन जव्हार शहरात सायंकाळच्या वेळेस थंडी जोर पकडत आहे. जव्हार तालूका हा घनदाट जंगल-दर्‍याखोर्‍यातील, अतिदुर्ग भाग असल्यामुळे येथे थंडी चांगलीच जाणवते. त्यामुळे येथील व्यापारी बंधुंनी तसेच फेरीवाल्यांनी थेट लुधियाना शहरातून लोकरीचे, रेग्जीनचे स्वेटर, शाल, कंबल, मफलर, कानटोपी, माकडटोपी इत्यादी व्हराईटीचे उबदार कपडे बाजारात विक्रीसाठी आनले आहेत. तसेच काही फेरीवाल्यांनी आपले दुकान चक्क रस्त्यांवर मांडून व्यवसाय करीत आहेत. ग्रामीण आदिवासी भाग असल्यामुळे या फुटपाथवरील दुकानांवर खरेदीकरीता खेडोपाड्यातील बांधवांची गर्दी दिसुन येते.खेडोपाड्यात लुधियानी व इतर प्रांतातील हलके भारी स्वेटर, उबदार कपडे, लहान मुलांचे-मुलींचे मोठ्यांचे स्वेटर, मफलर, कानटोपी वस्तू नाशीक येथून किरकोळ विक्रेते जव्हार तालुक्यातील खेडोपाड्यात फिरून विक्री करतांना दिसत आहेत.जव्हार शहरातील भाग शाळेसमोर, मेमन मार्केट, व एस. टी. स्टॅन्ड रोडवरील व्यापार्‍यांकडे आप आपल्या सोयीनुसार लहान मोठे स्वेटर, कोट, शाल, मफलर खरेदीची लगबग सुरू झालेली आहे. यावर्षी व्यापारी वर्गाने वेगवेगळे लोकरीने विणलेले चमकदार, दर्जेदार लेडीज-जेन्टस् स्वेटरचे प्रकार बाजारात विक्रीसाठी आणलेले आहेत. यात लहान मुलांचे-मुलींचे स्वेटर रू. 60/- ते 550/- पर्यत तर मोठे मुला-मुलींचे स्वेटर रू. 160/- ते 850/- रूपयांपर्यत तसेच लेदर मधील कोट हे लहान व मोठे रू. 190/- ते 950/- पर्यत बाजारात उपलब्ध आहेत. रात्रीच्या वेळेस शहरातील लोक घराबाहेर छोटी मोठी शेकोटी करताना दिसत आहेत. आजू बाजूला पडलेल्या सुक्या फाट्या, गवत, गोणपाट इत्यादी वस्तूचे वापर करून शेकोटी करतांना लोक दिसत आहेत.

- आम्ही खेडोपाड्यात कुडामातीच्या कच्च्या घरात राहतो, त्यामुळे आमच्या पोरा बाळांना थंडीचा खुपच सामना करावा लागतो, त्यामुळे आम्ही स्वेटर खरेदी करण्याकरीता जव्हाच्या बाजारपेठेत येतो.सुरेखा खुरकुटे - ग्राहक, हिरडपाडा