शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार शिक्षकांचा पगार आता १ तारखेलाच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:36 IST

प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना अवेळी वेतन दिले जात असल्याच्या समस्येकडे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधून गुरुवारी वेतन पथक व बँक आणि त्यातील तांत्रिक अडथळे दूर केले आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना अवेळी वेतन दिले जात असल्याच्या समस्येकडे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधून गुरुवारी वेतन पथक व बँक आणि त्यातील तांत्रिक अडथळे दूर केले आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील सुमारे १८ हजारांहून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार दरमहा १ तारखेला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी टीडीसीसी बँक व टीजेएसबी बँकांनीदेखील हमी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.वेतन पथक व बँकांमध्ये समन्वय साधण्यासाठी वेतन पथकासह टीडीसीसी बँक,टीजेएसबी बँकेच्या व्यवस्थापनाची गुरुवारी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) सभागृहात अ‍ॅड. डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली खास बैठक झाली. त्यात उद्भवलेल्या तांत्रिक अडथळ्यांवर मात करून दरमहा १ तारखेला वेतन देण्याचा निर्णय झाला. या बैठकीला टीडीसीसी बँकेचे राजेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर, वेतन पथकाच्या प्राथमिक विभागाचे अधीक्षक सुनील सावंत, माध्यमिक विभागाचे अधीक्षक विष्णू पाटील आदींसह बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षकांच्या वेतनासाठी जिल्ह्यातील एक हजार २१८ शाळांच्या मुख्याध्यापकांकडून राज्य सरकारच्या वेतन पथकाकडे पगाराची बिले सादर केली जातात. त्यानंतर, जिल्हा कोषागाराकडून वेतन पथकाला स्टेट बँक आॅफ इंडियाचा धनादेश दिला जातो. तो बँकेत वटल्यानंतर वेतन पथकाकडून टीडीसीसी बँकेला धनादेश मिळतो. त्यातच टीडीसीसीकडून टीजेएसबीतील खातेदार शिक्षकांची रक्कम वर्ग होत असल्यामुळे वेतनाला दिरंगाई होत असे. विशेषत: जिल्ह्यातील शिक्षकांना दरमहा १ तारखेला वेतन देण्याचा ठराव टीडीसीसीच्या संचालक मंडळाने याआधीच मंजूर केलेला आहे. मात्र, त्यानंतरही वेतनाला उशीर होत असल्याच्या शिक्षक संघटनांच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर डावखरे यांनी तांत्रिक बाबी दूर करण्यासाठी पुढाकार घेऊन १ तारखेला वेतन देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी दरमहा १० तारखेपर्यंत बिले सादर करावी. त्यानंतर, वेतन पथकाकडून २५ तारखेपर्यंत जिल्हा कोषागाराला मंजुरी देऊन बिले सादर केली जातील. त्याचवेळी बँकांच्या व्यवस्थापनाला वेतनासाठी शाळांची यादी सादर केली जाईल. त्यानुसार बँकांना वेतनाबाबतची औपचारिकता पूर्ण करता येईल.