शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

साकेत पुलाच्या कामामुळे पुन्हा वाहतूककोंडी

By admin | Updated: June 1, 2016 02:29 IST

साकेत पुलावरील नाशिक -मुंबई लेनच्या दुरूस्तीचे काम मंगळवारपासून हाती घेतल्याने त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.

ठाणे : साकेत पुलावरील नाशिक -मुंबई लेनच्या दुरूस्तीचे काम मंगळवारपासून हाती घेतल्याने त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. वाहनचालकांना येथून जाताना साधारणत: १० ते १५ मिनटे तात्कळत राहावे लागत होते. त्यातच ब्रीजवरील दुरूस्ती केलेल्या नाशिक-मुंबई या लेनवरू न वाहतूक सोडल्याने एका बाजूची वाहतूक थांबवून दुसरी बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात येत होती. त्यामुळे पहिल्या दिवशी वाहतूककोंडीचे चित्र पाहण्यास मिळाले.मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत खाडीपुलाच्या नाशिक मुंबई लेनच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून मुंबई-नाशिक लेनच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार, पहिल्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (सा.बा )विभागामार्फत पुलावरील अतिरिक्त डांबरीकरणाचा थर काढण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर जॉर्इंट तोडण्यात येणार आहे. साधारणत: दिलेल्या कालावधी अधीच हे काम पूर्ण करणार असल्याचे प्राधीकरण अधिकाऱ्यांनी सांगितले.याचदरम्यान,एक बाजू थांबवून दुसऱ्या बाजूची वाहतूक काढताना, शहरात साधारणत: २०० मीटरपर्यंत वाहनांच्या रांग लागल्याचे दिसत होते. तसेच सकाळी काही प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, ती होऊ नये यासाठी वाहतूक शाखेमार्फत काटेकोर नियोजन केले आहे. ती सुरळीत राखण्यासाठी २०० कर्मचारी आणि २३ अधिकारी असा चोख बंदोबस्त लावला आहे. (प्रतिनिधी)