शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीमुळे आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 23:42 IST

बँकेत जाणाºया नागरिकांवर पाळत ठेवून त्यांना लुबाडणाºया आंतरराज्य टोळीचा म्होरक्या अरुण देड्डा यास महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याण :मुंबई उपनगरांत नागरिकांना लुबाडून ही टोळी आंध्र प्रदेशात जात होती आणि पुन्हा मुंबई उपनगरांत येत होती. म्होरक्याला अटक झाल्याने उर्वरित आरोपीही लवकरच जेरबंद होतील, असा दावा पोलिसांनी केला आहे.बँकेत पैशांचे व्यवहार करणाºया नागरिकांवर बँकेबाहेर उभे राहून हे चोरटे पाळत ठेवत होते. कल्याण-डोंबिवली परिसरात बँकेतून पैसे काढून बाहेर पडणाºया नागरिकांना लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. पोलीस त्याचा तपास करत होते. ज्या बँकेच्या परिसरात अशा प्रकारच्या घटना घडल्या, तेथील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केली. त्या वेळी फूटेजमध्ये एक तरुण बँकेबाहेर दिसला. मात्र, त्याच्या हातात बँकेची स्लिप अथवा पासबुक दिसले नाही. त्याआधारे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तो अन्य एका बँकेच्या बाहेर उभा होता. त्याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली असता तो एका नागरिकावर लक्ष ठेवून असल्याचे दिसले. हा तरुण अचानक रांगेतून बाहेर पडला. पोलिसांनी त्याचा माग घेतला. त्याचे अन्य साथीदार पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक असलम खतीब यांनी सहकाºयांच्या साहाय्याने देड्डा याला पकडले. तो मूळचा आंध्र प्रदेशातील आहे. त्याचे अन्य साथीदार कांबळे, चड्डी आणि देवा हे पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा माग घेत आहेत.अजूनही लूटमारीच्या घटना सुरूचडोंबिवली पूर्वेतील संत नामदेव पथ येथील रहिवासी अर्जुन सावंत हे एक लाखाची रोकड घेऊन कॉर्पाेरेशन बँकेत भरण्यासाठी जात होते. त्या वेळी एकाने भूलथापा देऊन त्यांच्याकडील एक लाखाची रोकड लुबाडली.अन्य एका घटनेत पश्चिमेतील शास्त्रीनगरातील रितेश शहा हे बँकेत पैसे भरण्यासाठी जात असताना एकाने त्यांना भूलथापा देत त्यांच्याकडील ९६ हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.