शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

साई पक्षाची घालमेल वाढली

By admin | Updated: March 9, 2017 03:22 IST

उल्हासनगरच्या राजकारणात भाजपाला पाठिंबा देऊनही पदरी काही पडण्याची शक्यता दिसत नसल्याने साई पक्षाची घालमेल सुरू झाली असून त्यांनी विकासाच्या

उल्हासनगर : उल्हासनगरच्या राजकारणात भाजपाला पाठिंबा देऊनही पदरी काही पडण्याची शक्यता दिसत नसल्याने साई पक्षाची घालमेल सुरू झाली असून त्यांनी विकासाच्या मुद्दयावर पंधरवड्यात पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. उल्हासनगरमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यावर साई पक्षाने आधी शिवसेनेसोबत जाण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र पद सोडण्यात यापूर्वी खळखळ केल्याने दोन्ही पक्षांतील संबंध फारसे मधूर नाहीत. शिवाय हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतरही सत्तेचे गणित पूर्ण जुळत नव्हते. त्यामुळे साई पक्षाने लगोलग भाजपाच्या नेत्यांसोबत ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि उल्हासनगरमध्ये सत्तेसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा उल्हासनगरच्या विकासासाठी असल्याचेही साई पक्षाने जाहीर केले होते. साई पक्षाचा पाठिंबा घेण्यास भाजपातील मोठ्या गटाचा विरोध होता. त्यापेक्षा शिवसेनेसोबत जाण्याची त्यांची सूचना होती. गेली दहा वर्षे सत्तेसाठी पाठिंबा देताना महापौरपदासह अन्य महत्त्वाची पदे पदरात पाडून घेण्याची सवय असल्याने त्या पक्षात गेले आठवडाभर चलबिचल सुरू होती. त्यात भाजपाच्या नेत्यांनी बिनशर्त पाठिंबा खूपच मनावर घेतल्याने, त्यांनी त्यानंतर साई पक्षाला कोणतेही आश्वासन न दिल्याने या पक्षाच्या नेत्यांची घालमेल सुरू झाली. खोरखरीच पदरात काही पडले नाही, तर आर्थिक गणिते जुळवायची कशी असा त्यांच्यासमोरील महत्वाचा प्रश्न होता. त्यात ‘वर्षा’वर नेणारे नेते आता स्थानिक पातळीवर लक्ष घालत नसल्याने साई पक्षाची पुरती कोंडी झाल्याचे चित्र होते. त्यातून काहीतरी तोडगा निघावा आणि भाजपाने सत्तेत सहभागी करून घ्यावे, म्हणूनच त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. कंत्राटांच्या पारदर्शकतेचा वादसाई पक्ष हा ज्या आर्थिक गटाचे प्रतिनिधित्त्व करतो, त्या गटाचे आजवर उल्हासनगरच्या बहुतांश कंत्राटांवर वर्चस्व राहिले आहे. ते मोडून काढावे अशी भाजपातील एका गटाची भूमिका आहे. तसे झाले तरच उल्हासनगरच्या विकासातील नेहमी येणारे अडथळे दूर होतील आणि विकासाचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी उल्हासनगरच्या कारभारात पारदर्शकता असावी असा मुद्दा पुढे आणून साई पक्षाचे पंख छाटण्याचे काम सुरू केले आहे. (प्रतिनिधी)शिवसेना-भाजपा संबंधांत सुधारणामुंबईत शिवसेनेच्या महापौरांना भाजपाने पाठिंबा दिल्याने, ठाण्यात शिवसेनेच्या महापौरपदाविरूद्धचा उमेदवार मागे घेतल्याने आणि कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने भाजपाला त्यांच्या वाट्याची पदे आढेवेढे न घेता दिलियाने या दोन्ही पक्षातील संबंध सुधारू लागले आहेत. त्याची धास्ती साई पक्षाने घेतली आहे. शिवसेनेने उल्हासनगरात भाजपाला असाच पाठिंबा दिला, तर साई पक्षाची आवश्यकताच भासणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यात भाजपाने आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांसोबत जाऊन आपल्या गटाची कोकण आयुक्तांकडे स्वतंत्र नोंदणीही करून टाकली आहे.महापौर आमचाच : आयलानीपक्षाचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक जमनुदास पुरस्वानी यांची गटनेतेपदी नियुक्ती केल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली. उल्हासनगरचा महापौर काहीही झाले तरी भाजपाचाच असेल, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. शिवसेना आली तरीही सोबत : ईदनानीआम्ही शहर विकासासाठी भाजपा सोबत आहोत. विकास आराखडयाला मंजुरी, अंबरनाथ-कल्याण महामार्गाचे अर्धवट काम त्वरित सुरू करणे, बाधित व्यापाऱ्यांना पर्यायी जागा देणे आदी मागण्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीत केल्याचे साई पक्षाचे नेते जीवन इदनानी यांनी सांगितले.भाजपने पुढील काळात शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले, तरी साई पक्षाचा भाजपाला पाठिंबा कायम राहील, असे इदनानी म्हणाले.ओमी यांच्याही मागण्या सुरूसाई पक्षाला उल्हासनगरमध्ये पुन्हा मोकळे रान दिले, तर भाजपाला उल्हासनगरात उभे राहणे कठीण जाईल, यावर पक्षातील एका गटाचा भर असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, भाजपाच्या नगरसेवकांतील मोठा गट माझा आहे, असे प्रत्यक्ष सुचवत ओमी कलानी यांनीही महापौरपदासह आपल्या मागण्या पुढे रेटण्यास सुरूवात केली आहे.