शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

संकेत जाधव यांच्या आत्महत्येचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 02:49 IST

महापालिका कंत्राटदाराच्या आत्महत्येला आर्थिक परिस्थिती कारणीभूत असल्याच्या मुद्यावर तपास यंत्रणा तूर्तास तरी ठाम नाही. त्याच्या मित्र मंडळीशी केलेल्या चर्चेतून ही माहिती समोर आल्याने आत्महत्येचे गूढ आणखी वाढले आहे.

ठाणे : महापालिका कंत्राटदाराच्या आत्महत्येला आर्थिक परिस्थिती कारणीभूत असल्याच्या मुद्यावर तपास यंत्रणा तूर्तास तरी ठाम नाही. त्याच्या मित्र मंडळीशी केलेल्या चर्चेतून ही माहिती समोर आल्याने आत्महत्येचे गूढ आणखी वाढले आहे.महापालिकेचे कंत्राटदार संकेत जाधव (वय ३६) यांनी रविवारी दुपारी स्वत:वर अ‍ॅटोमॅटीक पिस्तुलाने गोळ्या झाडून आत्महत्या केली. गायमुखजवळ कार रस्त्याच्या कडेला लावून त्यांनी छातीमध्ये तीन गोळ्या झाडून घेतल्या. तत्पूर्वी त्यांनी कार आतमधून लॉक केली होती. दुपारी ५.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तत्पूर्वी ४ वाजताच्या सुमारास ते पाचपाखाडी येथील पसायदान सोसायटीतील राहत्या घरून बाहेर पडले. घोडबंदर रोडवरील गायमुखजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी कार पुन्हा ठाण्याच्या दिशेने वळवली. रस्त्याच्या कडेला कार सुरूच ठेवून त्यांनी जीवनयात्रा संपवली.आर्थिक अडचणीतून प्रचंड नैराश्य आलेल्या नेत्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरू आहे. प्रत्यक्षात पोलीस यंत्रणेने या मुद्याला दुजोरा दिला नाही. आत्महत्येसारखा निर्णय घेण्याएवढ्या वाईट आर्थिक परिस्थितीला ते सामोरे जात होते, असे तूर्तास तरी दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या संपर्कातील काही मित्र, कंत्राटदार आणि महापालिकेच्या अधिकाºयांशी पोलिसांनी चर्चा केली. त्यांनी केलेल्या काही कामांची देयकेही महापालिकेमध्ये सादर केली नसल्याचे पोलिसांना समजले. आयुष्य संपवण्याएवढी आर्थिक परिस्थिती बिकट असती, तर त्यांनी त्यांच्या कामांची देयके महापालिकेकडे सादर करून त्यासाठी किमान पाठपुरावा तरी केला असता, असे मत पोलिसांनी व्यक्त केले. त्यांच्या भावाचा पाणीपुरवठ्याचा व्यवसाय आहे. अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या संकेत यांना धूम्रपानाव्यतिरिक्त अन्य कोणतेही व्यसन नव्हते. दररोज रात्री ९ ते ९.३० वाजेपर्यंत ते घरी जायचे. वर्षभरापूर्वी ते पाचपाखाडी येथील पसायदान सोसायटीमध्ये वास्तव्यास गेले. तत्पूर्वी त्यांचे वास्तव्य याच भागात होते. पिस्टलच्या परवान्यावर त्यांच्या जुन्या घरचा पत्ता नमूद आहे. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. एकदोन दिवसांत कुटुंबीय आणि इतर संबंधितांची विचारपूस करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.