शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सद्गुरू अर्थात अंतर्मनावर सोपवा आपला ताणतणाव; प्रल्हाद पै यांचे आनंद मेळाव्यात आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 05:46 IST

प्रल्हाद पै यांचे आनंद मेळाव्यात आवाहन

कर्जत : तणाव हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे ताणतणाव तुम्ही सद्गुरू यांच्यावर म्हणजे अंतर्मनावर सोपवा, असे आवाहन जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी रविवारी आनंद मेळाव्यात केले. जे आहे त्याच्याबद्दल आणि ज्यांच्यामुळे मिळाले आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगा. जो क्षण आहे त्याचा आनंद घ्या आणि सतत सद्गुरू यांचा किंवा परमेश्वराचे स्मरण करा, असे तीन महत्त्वपूर्ण मंत्र त्यांनी तणाव येऊ नये म्हणून यावेळी दिले. 

श्री सद्गुरू वामनराव पै प्रणीत जीवनविद्या मिशनतर्फे ‘आनंद मेळावा’ आयोजित केला आहे. रविवारी दुसऱ्या दिवशी ज्यांचा सद्गुरू कार्यात खूप मोठा वाटा आहे, अशा जीवनविद्या मिशनच्या ज्येष्ठ नामधारकांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जीवनविद्या मिशनचे ज्येष्ठ नामधारक रमेश चिंदरकर ऊर्फ नारायण चिंदरकर यांचा जीवनविद्येचे जीवनगौरव पुरस्काराने, तर प्रभाकर नाईक आणि प्रभाकर देसाई यांचादेखील जीवनविद्या गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

जीवनविद्या मिशनतर्फे २०२२ -२३ हे वर्ष सद्गुरूंचे जनशताब्दी वर्षे म्हणून साजरे करण्यात येणार आहे. हे वर्ष ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहित आणि विश्वशांती’ या विचाराने साजरे केले जाणार आहे. या विचाराप्रमाणे जीवनविद्या मिशनचे असंख्य नामधारक वागत असतात. जीवनविद्या मिशनमधील पहिले नामधारक आयएस अधिकारी मकरंद खेतमाळी हे या कार्यक्रमात उपस्थित होते. हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून खेतमाळीस हे कार्यरत आहेत. ‘

जीवनविद्या मिशन’ ही संस्था मोठे कार्य करीत आहे. कामामुळे या कार्यात सहभागी होणे शक्य होत नाही पण या कार्याचा मुख्य हेतू ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची’ याप्रमाणे वागण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. क्षणोक्षणी सद्गुरूंचा आशीर्वाद आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाची महती मला आली’  असे खेतमाळी यांनी यावेळी सांगितले.   

टॅग्स :Karjatकर्जत