शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साड्या, पडद्यांपासून बनवल्या पिशव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:37 IST

‘इनरव्हिल क्लब’तर्फे शून्य कचरा मोहिमेअंतर्गत जमा केलेल्या वापरण्याजोग्या साड्या, चादर व पडदे यापासून कापडी पिशवी तयार केल्या जाणार आहेत.

जान्हवी मोर्येडोंबिवली : ‘इनरव्हिल क्लब’तर्फे शून्य कचरा मोहिमेअंतर्गत जमा केलेल्या वापरण्याजोग्या साड्या, चादर व पडदे यापासून कापडी पिशवी तयार केल्या जाणार आहेत. या पिशव्या दुकानदारांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांना सक्षम पर्याय मिळणार आहे.ऊर्जा फाउंडेशन, समतोल इको वर्क्स डोंबिवली, इनरव्हिल क्लब आणि मिलापनगर असोसिएशन यांच्यातर्फे शहरात घरातील जाड प्लास्टिक, पातळ प्लास्टिक, ई-कचरा, जुन्या चपला, बूट, वापरण्यायोग्य जुने पण चांगले कपडे, बॅग व पर्स, थर्माकोल या वस्तू गोळा केल्या जातात. जुन्या कपड्यांपासून पिशव्या तयार करण्याचे काम इनरव्हिल क्लबने हाती घेतले आहे. हे काम बचत गटांना दिले आहे. बचत गटांकडून आठ रुपयाला एक पिशवी शिवून घेतली जाते. त्यावर लोगो लावण्यासाठी दोन रुपये खर्च येतो. संस्थेला ही पिशवी एकूण १० रुपयांना पडते. संस्था या पिशव्या दुकानदारांना देणार आहे.‘इनरव्हिल’तर्फे दुकानदारांना भेटून या पिशव्या घेण्याचे आवाहन करणार आहेत. दुकानदार त्याला १० रुपयांना मिळणारी एक नग पिशवी ग्राहकांना १२ रुपयाला देणार आहे. ग्राहकांनी दुसऱ्या दिवशी ती पिशवी दुकानदाराला परत केल्यास त्याला १० रुपये परत केले जाणार आहेत. ग्राहकांनी पिशवी दुकानदाराला न दिल्यास त्याला ती १२ रुपयांमध्ये वापरता येते. ग्राहकांनी दुकानदाराला दिल्यास त्याला २ रुपये नफा कमवता येणार आहे. तसेच कापडी पिशव्यांचा पुर्नवापर होईल. २५० पिशव्या तयार केल्या आहेत, अशी माहिती अपर्णा कवी यांनी दिली आहे.