शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सासूनं जावयाची गळा दाबून केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 16:07 IST

मुलीला झालेली जुळी मुले सासुरवाडीहून जबरदस्तीने आणल्याचा रागातून सासूने आपल्या जावयाचा गळा घोटून खून केल्याची घटना डोंबिवलीच्या ठाकूरवाडी येथे गुरुवारी रात्री घडली.

डोंबिवली, दि. 28 - मुलीला झालेली जुळी मुले सासुरवाडीहून जबरदस्तीने आणल्याचा रागातून सासूने आपल्या जावयाचा गळा घोटून खून केल्याची घटना डोंबिवलीच्या ठाकूरवाडी येथे गुरुवारी रात्री घडली. पोलिसांनी अनिता चांदू वळंदे (52) हिला तात्काळ मुंब्र्यातून आणून गजाआड केले. कल्याण कोर्टात शुक्रवारी हजर केले असता कोर्टाने अधिक तपासासाठी तिला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.रवी रमेश सोलंकी (25) असे मृत जावयाचे नाव असून तो ठाकूरवाडीतील फुलेनगर झोपडपट्टीत राहतो. गोपी टॉकीज जवळ फुटपाथवर फूल विक्री करणाऱ्या रवीचे लग्न मुंब्र्यातील रेतीबंदरला असलेल्या पंजाबी कॉलनीत राहणाऱ्या सोनाबाई (23) हिच्याशी 2 वर्षांपूर्वी झाले. गर्भवती राहिलेली सोनाबाई ही माहेरी 10 महिन्यापासून राहत होती. 4 महिन्यांपूर्वी ती प्रसूत झाली. प्रसूतीनंतर तिला जुळी मुले झाली. 4 महिने झाले तरी ती सासरी यायचे नाव घेत नव्हती. रवी सासुरवाडीला पत्नीला आणण्यासाठी गेला असता त्याला सासू अनिता हिने वाद घातला. त्यामुळे रवी हा काल (गुरूवारी) सकाळी सासुरवाडीत गेला व आपली जुळी मुले घेऊन डोंबिवलीत दुपारी एकच्या सुमारास आला. त्याच दिवशी रात्री 11 वाजता घरातील सर्वजण जेवण करण्याच्या तयारीत असतानाच सासू अनिता आणि पत्नी सोनाबाई या घरी आल्या. सोनाबाई जुळ्या मुलांना घेऊन घराबाहेर पळाली, तर सासू अनिता हिने गळा घोटून रविचा खून केला. या प्रकरणी मृत रवीची आई मनुबाई सोलंकी (58) हिच्या तक्रारीनंतर विष्णूनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी अनिता वळंदे हिला अटक केली.