शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दुचाकी अपघात रोखण्यासाठी आरटीओची अनोखी शक्कल

By अजित मांडके | Updated: November 8, 2023 15:57 IST

दुचाकी अपघाताच्या वाढत्या घटना लक्ष्यात घेता हि शक्कल लढविण्यात आली आहे.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : दुचाकी स्वारानी नियमानुसार सुरक्षित वाहन चालवण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने अनोखी शक्कल लढवली आहे. दुचाकीचे लायसन काढण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला सिम्युलेटर मशीनवर सराव करायला मिळणार आहे. दुचाकी अपघाताच्या वाढत्या घटना लक्ष्यात घेता हि शक्कल लढविण्यात आली आहे.

युनायटेड वे संस्था आणि  एएलडी ऑटोमोटिव्ह यांच्या सहकार्याने  सिम्युलेटर मशीनवर दुचाकी चालविण्याचा फील दिला जात असून, सिग्नल, रस्ते, नागमोडी वळण, पाऊस, गतिरोधक आदी सर्वांचा समावेष करण्यात आला आहे.यामुळे चालकांना दुचाकी चालविताना दोष समजणार आहेत. मर्फी जवळील ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रस्ता सुरक्षा मार्गदर्शन कक्षाचे आणि दुचाकी सिम्युलेटर चे उदघाटन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्या हस्ते पार पडले यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. विजय शेळके, प्रसाद नलवडे,  युनायटेड वे तेजस्विनी, आर्या जयस्वाल, उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. विनय राठोड म्हणाले की, आजच्या तरुण पिढीसाठी सिम्युलेटरचे नवीन तंत्रज्ञान खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. वाहतूक नियमांनुसार वाहन चालविणे केव्हाही सुरक्षित असते. मात्र अनेकजण नियमांची पायमल्ली करतात. दुचाकी चालवताना आपले दोष काय आहेत हे समजण्यासाठी सिम्युलेटर मशीन मदतगार ठरू शकेल. दुचाकी स्वाराने वाहतुक नियमानुसार गाडी चालविणे अपेक्षित आहे.  रस्त्यावरील सिग्नल, खुणा, वेग मर्यादा, आदी सर्व गोष्टींचा अभ्यास करून टेस्ट ड्राईव्हची परीक्षा देणं  उत्तम असते. मात्र परीक्षेत वाहन चालविताना चुका घडतात आणि चालकाला अनुत्तीर्ण केलं जात. मात्र हे टाळण्यासाठी सिम्युलेटर मशीन महत्वाचा दुवा असणार आहे. 

दुचाकी स्वारासाठी सिम्युलेटर कक्ष ठेवला आहे. सिम्युलेटर मशीन असून सर्व मांडणी दुचाकीसारखी आहे. केवळ संगणकीय स्क्रीन बघून वाहन चालवायचे आहे. यात एक्सलेटर, गियर, आदी सर्व दिल असून स्क्रीनवर दिसणारे रस्ते, चौक, सिग्नल, नागमोडी वळण, खड्डे, पाऊस, शाळा, रुग्णालय धुकं आदी सर्व दाखविले आहे. शहर/महामार्ग, कमी जास्त गर्दी , विविध प्रकारचे हवामान, विविध प्रकाशयोजना, पाऊस, धुके, इ  प्रकारची परिस्थिती संगणकात निर्माण करता येते , ज्याद्वारे विविध परिस्थितीत वाहन चालविण्याचा सराव अथवा चाचणी घेता येते. शेवटी संगणकीय चाचणीचा निकाल देखील स्क्रीन वर दिसतो. जयंत पाटील (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे )

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस