शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, पालघरमध्ये एकाच दिवसात ५३७ बसवर आरटीओची कारवाई; ३० वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:27 IST

परिवहन विभागाचे आदेश : प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह २५ अधिकारी रस्त्यावर

ठाणे : राज्यभर चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार ठाणे आणि पालघर जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्यासह २५ अधिकाऱ्यांच्या चमूने ५३७ वाहनांवर कारवाई केली. तर ३० बसेस जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यात ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान एकाच वेळी ही मोहीम राबविण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी राज्यभरातील परिवहन अधिकाऱ्यांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पडघा, घोडबंदर रोड, कळवा - खारेगाव नाका आणि पालघर चेक पोस्ट तसेच नवी मुंबई आणि कल्याण या ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. यावेळी स्वत: ठाणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी गायकवाड यांच्यासह मुख्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे, अंमलबजावणी विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील सर्व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहन निरीक्षक आणि सहायक मोटर वाहन निरीक्षक अशा अधिकाऱ्यांच्या चमूने ही कारवाई ठिकठिकाणी केली. यामध्ये विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक करणे, प्रवासी बसमधून अवैधरित्या माल वाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीरपणे फेरबदल करणे, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक आणि मोटार वाहन कर बुडविणे आदी बाबींची पडताळणी करण्यात आली. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तीन हात नाका येथे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस पकडण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी आरटीओने अशाच प्रकारे ओव्हरलोड वाहतूक तसेच अवैध प्रवासी वाहतूकीवर कारवाई केली होती. कारवाया थंडावल्यानंतर पुन्हा अवैध वाहतूक सुरु झाली. त्यामुळे राज्यभर अशा प्रकारे पुन्हा कारवाईचे आदेश परिवहन कार्यालयाने दिले होते. या कारवाईमध्ये अवघ्या १२ तासांमध्ये पडघा येथे ७५ बसेसवर कारवाई झाली. दोन बसेस जप्त करण्यात आल्या. त्यापाठोपाठ तीन हात नाका येथे ८० बसेसवर कारवाई करुन दोन बसेसवर जप्तीची कारवाई झाली. घोडबंदर रोड येथे ३७ कारवाया झाल्या. त्यातील चार वाहने जप्त झाली.  अवैध प्रवासी वाहतुकीबाबतच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिवहन कार्यालयातून आलेल्या आदेशानुसार ठाणे आणि पालघरमध्ये ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात ५३७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर ३० वाहने जप्त करण्यात आली.- रवींद्र गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस