शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटी बसचालकाला रिक्षाचालकांची मारहाण, हल्लेखोर पसार : मद्यप्राशन केल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:43 IST

मुलुंड ते भिवंडी या मार्गावरील शंकर गाडे (३५) या ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) चालकाला काही रिक्षाचालकांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास माजीवडा नाका येथे घडली. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : मुलुंड ते भिवंडी या मार्गावरील शंकर गाडे (३५) या ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) चालकाला काही रिक्षाचालकांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास माजीवडा नाका येथे घडली. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या चालकाने मद्यप्राशन करून बस चालविल्याचा संशय काही नागरिकांनी व्यक्त केला होता. त्याच्या बसने एका उभ्या असलेल्या कारला गोल्डन डाइज नाका येथे धडक दिली. तेव्हा काही रिक्षाचालकांच्या आग्रहाने कारचे काय नुकसान झाले, हे पाहण्यासाठी गाडे खाली उतरले. तेव्हात्यांना वाहतूक पोलीस चौकीत येण्यास एका टोळक्याने भाग पाडले. चौकीत नेत असतानाच, रिक्षाचालकांच्या एका टोळक्याने त्यांना जबर मारहाण केली. कापूरबावडी वाहतूक नियंत्रण शाखेच्या चौकीमध्ये श्वास विश्लेषक यंत्राद्वारे त्यांची तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यांनी मद्यप्राशन केले नसल्याचे आढळले. या तपासणीत सत्य बाहेर आल्यानंतर, त्याला मारहाण करणाºयांनी मात्र तिथून पळ काढला. काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकांकडून तरुणीचा चालत्या रिक्षातच विनयभंग केल्याच्या दोन घटना कापूरबावडी परिसरातच घडल्या होत्या. प्रवासी नाकारणे, जादा भाडे घेणे हे तर नित्याचेच आहे. त्यातच टीएमटी बसचालकालाही त्यांनी मारहाण केल्याच्या घटनेने टीएमटी चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.प्रवासी घेण्याच्या आकसातून मारहाण -  भिवंडीकडे जाणा-या रस्त्यावर माजीवडा नाका (गोल्डन डाइज नाका) येथे टीएमटीच्या थांब्यावरूनच काही रिक्षाचालक प्रवासी घेतात. त्यांना टीएमटी बसचा अडथळा वाटतो.याच आकसातून त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचे शंकर गाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणे