शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

रोटरीचा ‘गो व्हिलेज’ प्रकल्प कासगाववाडीत

By admin | Updated: January 14, 2017 06:25 IST

तालुक्यातील अनेक गावे आजही विकासापासून दूर आहेत. मात्र, असे असले तरी ते निसर्गसौंदर्य जपून आहेत. अशाच गावांपैकी

बदलापूर : तालुक्यातील अनेक गावे आजही विकासापासून दूर आहेत. मात्र, असे असले तरी ते निसर्गसौंदर्य जपून आहेत. अशाच गावांपैकी एक गाव घेऊन त्यात विविध कार्यक्र म घेण्याचा रोटरीचा उपक्र म सध्या वांगणीतील कासगाववाडी येथे सुरू आहे. यंदा कासगाववाडी हे गाव दत्तक घेतले असून रोट्रॅक्ट क्लब आॅफ आदर्श महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नववर्षात येथे कार्यक्र म सुरू केले आहेत.शहर आणि विकासापासूनही दूर असलेल्या अशा गावांमध्ये जाऊन अनेक प्रबोधनपर, मनोरंजन आणि विकास करणाऱ्या कार्यक्र मांचे उद्दिष्ट हाती घेत रोटरीच्या विद्यार्थी शाखेच्या वतीने ‘गो व्हिलेज’ अर्थात गाव दत्तक योजना राबवली जात आहे. याच उपक्र मांतर्गत आदर्श महाविद्यालयाच्या रोट्रॅक्ट क्लबच्या सदस्यांनी यंदाच्या वर्षी वांगणीजवळील कासगाववाडी हे गाव दत्तक घेतले आहे. यापूर्वी बदलापूरजवळील कुडेरान या गावात अशा प्रकारे दत्तक घेऊन तेथे कार्यक्र म केले होते. या उपक्र मात चार दिवसांची भेट दिली जाते. त्यानुसार, रोटरीच्या सदस्यांनी येथे कार्यक्र मांना सुरुवात केली आहे. नुकतीच येथे स्वच्छता मोहीम राबवून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. या वेळी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, स्वच्छता, शिक्षण अशा अनेक विषयांवर मार्गदर्शनही करण्यात आले. ग्रामस्थांना या गोष्टी पटवण्यासाठी पथनाट्यही सादर करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ आणि लहान मुलांना आरोग्यविषयक वस्तूंचे वाटपही करण्यात आले. तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा आणि ग्रामस्थांसाठी चौकात चित्रपटाचे प्रदर्शनही करण्यात आले. (प्रतिनिधी)