शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

ठाण्यात रोबोट करणार वाहन पार्किंग; महापालिकेचा नव्या वर्षातील प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 00:31 IST

महापौर नरेश म्हस्के यांची संकल्पना

- अजित मांडके ठाणे : शहरात जवळपास लोकसंख्येइतकीच वाहनांची संख्या झाल्यामुळे पार्किंगची गंभीर समस्या बनली आहे. पार्किंगची ही समस्या सोडवण्यासाठी रोबोट पार्किंग ही अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नव्या वर्षात महापालिका मुख्यालयासमोरील रस्ता आणि गडकरी रंगायतन येथे ही संकल्पना राबवली जाईल, अशी माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे ठाणेकरांसाठी नव्या वर्षाची ही खास भेट ठरणार आहे.शहरातील अरुंद रस्ते, वाढती वाहने आणि रस्त्यांवर उभी राहणारी बेशिस्त वाहने यामुळे विविध भागांत वाहतूककोंडी होताना दिसते. त्यासाठी गावदेवी भाजी मंडई, रेल्वे स्थानक परिसर, पोखरण रोड नं.२ आदींसह गावदेवी मैदान येथे भूमिगत पार्किंगची सुविधाही राबवली जात आहे. तसेच नाल्यावर पार्किंग सुरू केली आहे. आणखी दोन ठिकाणी नाल्यावरील पार्किंग सुरू करण्याचा मानस आहे. मात्र, आता आहे त्या जागेत वाहतूककोंडी न होता रोबोट पार्किंग ही अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हस्के यांनी दिली. पहिल्या टप्यात दोन ठिकाणी हा प्रयोग केला जाणार आहे. यामध्ये महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर आणि गडकरी रंगायतनजवळ असलेल्या बाजूच्या जागेवर हा प्रयोग केला जाणार आहे. यासंदर्भात पहिली बैठक पार पडली असून नव्या वर्षात दोन ठिकाणी हा पायलेट प्रोजेक्ट म्हणून राबवला जाणार आहे.असा असेल प्रकल्पअतिशय कमी जागेत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपले वाहन त्याठिकाणी सोडायचे. तेथून रोबोट तुमचे वाहन नेऊन ठरलेल्या जागेत पार्क करणार आहे. परदेशात ही संकल्पना राबवली जात असून ही ठाण्यातही ही सुविधा सुरू करण्याचे विचाराधीन आहे. रस्त्याच्या मधोमधसुद्धा ही सुविधा उपलब्ध करून देता येईल, असे महापौरांनी सांगितले.याशिवाय परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

टॅग्स :Parkingपार्किंग