शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

रेशनिंग दुकानदारांकडून लूट

By admin | Updated: December 9, 2015 00:38 IST

हिवाळा सुरु झाल्याने सामान्य वर्गातील कुटुंबांकडून रेशनिंगवर काळ्याबाजारातून मिळणाऱ्या रॉकेलच्या खरेदीची मागणी वाढत आहे.

राजू काळे,  भार्इंदरहिवाळा सुरु झाल्याने सामान्य वर्गातील कुटुंबांकडून रेशनिंगवर काळ्याबाजारातून मिळणाऱ्या रॉकेलच्या खरेदीची मागणी वाढत आहे. ही मागणी लक्षात घेता शहरातील रेशनिंग दुकानदार त्या खरेदीदारांकडून सुमारे ८० ते १०० रुपये दर आकारुन त्याची विक्री करीत असल्याचे उजेडात येत असूनही विभागीय रेशनिंग पुरवठा कार्यालय त्याकडे डोळेझाक करुन काळ्याबाजाराला उत्तेजन देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात रेशनिंगची ११४ दुकाने असून त्यात उपलब्ध होणाऱ्या जिन्नसांची खरेदी केशरी व अन्तोदय वा पिवळे कार्डधारकांकडून मोठ्याप्रमाणात केली जाते. यातील केशरी कार्डधारकांची संख्या सुमारे ९७ हजार तर अन्तोदय व पिवळे कार्डधारकांची संख्या सुमारे २ हजार ७०० इतकी आहे. १५ रु. प्रती लिटरप्रमाणे रॉकेल तर पिवळे वा अन्तोदय रेशन कार्डधारकांना २ रुपये किलोप्रमाणे गहु व ३ रुपये किलोप्रमाणे तांदुळ उपलब्ध करुन दिला जात आहे. हे जिन्नस संबंधित कार्डधारकांससाठी उपलब्ध असले तरी अनेकवेळा ते काही रेशन दुकानदारांकडून दिले जात नाहीत तर काही वेळा त्यांचा पुरवठा कमी झाल्याने ती कमी प्रमाणात दिली जात असल्याचा दावा पिवळ्या रेशनकार्डधारकांकडून करण्यात आला आहे. याबाबत आम आदमी पार्टीचे स्थानिक अध्यक्ष सुखदेव बेन सिंग यांनी सांगितले की, याविरोधात विभागीय रेशनिंग कार्यालयात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असूनही त्यावर कारवाई केली जात नाही. यामुळेच रेशन दुकानदार गरीबांसाठी उपलब्ध असलेल्या जिन्नसांचा खुलेआम काळाबाजार करण्यास धजावत आहेत. मीरा-भार्इंदर विभागीय रेशनिंग अधिकारी पी. पी. मनसेकर यांनी सांगितले की, रेशनिंगचा काळाबाजार रोखण्यास रेशनिंग कार्यालयाला त्वरीत कारवाई करता येत नसल्याने तसा प्रकार निदर्शनास आल्यास त्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात यावी.