शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल ग्राहकांची लूट पालघरला उघडकीस

By admin | Updated: September 5, 2015 02:54 IST

पालघरच्या गणेशकुंडाजवळील भारत पेट्रोलियमच्या सी.टी. पारीख पेट्रोलपंपावर रिडींगवर दाखविलेल्या लिटरपेक्षा कमी पेट्रोल दिले जात असल्याची फसवेगिरी लोकमतने उघडकीस आणली

पालघर : पालघरच्या गणेशकुंडाजवळील भारत पेट्रोलियमच्या सी.टी. पारीख पेट्रोलपंपावर रिडींगवर दाखविलेल्या लिटरपेक्षा कमी पेट्रोल दिले जात असल्याची फसवेगिरी लोकमतने उघडकीस आणली असून पुरवठा अधिकाऱ्यांनी हा पेट्रोलपंप तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.पालघरच्या सी.टी. पारीख पेट्रोलपंपामधून ग्राहकांनी मोजलेल्या दामापेक्षा कमी व रॉकेलमिश्रित पेट्रोल दिले जात असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने गुरुवारी दुपारी लोकमतचे वार्ताहर आरीफ पटेल यांनी दोन मोटारसायकली पेट्रोल भरण्यासाठी पाठवल्या. त्याप्रमाणे देवराम वायडा, रा. करळगाव (मनोर) व पिंटू वर्मा, रा. मस्तान नाका यांनी आपल्या मोटारसायकलींमध्ये पेट्रोल टाकून त्याच्या पावत्याही घेतल्या. त्यानंतर, पेट्रोलपंप कार्यालयातील कर्मचाऱ्याला सोबत घेऊन दोन्ही गाडीतील पेट्रोल नळीद्वारे बाहेर काढून मोजले असता अवघे चार लीटर निघाले. या फसवाफसवीचे वृत्त जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी जिल्हाधिकारी राजेश काटकर, जिल्हापुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांच्या कानी घातल्यानंतर तपासाची चक्रे हलली. तालुका पुरवठा अधिकारी संभाजी पावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता प्रथमदर्शनी ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांपेक्षा कमी पेट्रोल दिले जात असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. याच वेळी वैध मापन परिमाण विभागाकडून प्रमाणित करून दिलेल्या पेट्रोल भरण्याच्या मापन यंत्रात फेरफार करून कमी पेट्रोल देण्याचे सेटिंग करून ठेवल्याचे दिसून आले. याबाबत तालुका वैध मापन परिमाण निरीक्षक महेंद्र सुखसे यांना माहिती दिली असता कळविले. ते उशिरा आले आणि पेट्रोल वितरण व्यवस्थेत दोष नसल्याचे सांगून त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.