शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते खोदकामांमुळे नागरिक त्रस्त; विविध कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 23:32 IST

पावसाळ्यात झाली होती चाळण

मीरा रोड : लांबलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांच्या चाळणीनंतर खड्डे भरून रस्ते सुस्थितीत करण्याचे काम पूर्ण होत नाही, तोच आता विविध कामांसाठी शहरातील रस्त्यांवर खोदकामे केली जात आहेत. पावसाळ्यातील खड्ड्यांपासून शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असताना या खोदकामांमुळे पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.मीरा-भार्इंदर महापालिका आणि बहुतांश नगरसेवकांच्या रस्ते, गटारे आदी विविध बांधकामांमधील कारभाराचा प्रत्यय नागरिकांना नवीन नाही. रस्त्याच्या कामाचा दर्जा व समतोलपणा नसल्याने पावसाळा सुरू होत नाही, तोच शहरातील रस्ते खड्ड्यांत जातात. रस्त्यांची पार चाळण होते. या खड्ड्यांमुळे पादचारी व वाहनचालकांचा जीव टांगणीला लागतो. खड्डे चुकवत चालणे म्हणजे दिव्यच असते. यंदा खड्ड्याने एका तरुणाचा बळी घेतला आहे.पावसाळा लांबल्याने यंदा तर खड्ड्यांचा जाच शहरवासीयांना अगदी आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत सोसावा लागला. आजही काही ठिकाणी खड्डे कायम आहेत. त्यातच, ज्या रस्त्यांवरील खड्डे बुजवले वा नव्याने डांबरीकरण केले, ते रस्ते विविध कामांसाठी पुन्हा खोदून ठेवले आहेत. अदानी पॉवर, महानगर गॅस, जीओ-एमटीएनएल आदींच्या केबल टाकणे तसेच पालिकेचे नाले, नळजोडण्या आदींची कामे करण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत.शहरातील बहुतांश रस्त्यांवर खोदकामे सुरू केली असून काशिमीरा ते सावरकर चौकापर्यंतच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्गावर मेट्रोसाठी खोदकाम सुरू आहे. या खोदकामांमुळे वाहतूककोंडी होते. पादचारी नागरिकांना चालणे जिकिरीचे झाले आहे. शहरातील रस्ते, पदपथावर आधीच बेकायदा वाहन पार्किंग, फेरीवाले, टपऱ्यांचे अतिक्रमण, गॅरेज, कार शोरूम आदींनी रहदारी व वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर महापालिका आणि नगरसेवकांकडून डोळेझाक केली जात असताना रस्ते खोदून ठेवल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आदींना तर जीव मुठीत धरून चालावे लागते. तर, धुळीच्या त्रासाने नागरिक बेजार झाले आहेत.कंत्राटदाराला दिलेले पैसे वायाखड्डे खोदकामाच्या ठिकाणी होणारी दिरंगाई, पसरवून ठेवली जाणारी माती आणि वाहतुकीच्या नियमासह सुरक्षिततेची न घेतली जाणारी काळजी यामुळे खोदकाम धोकादायक ठरत आहे. नुकतेच खड्डे भरून वा नव्याने डांबरीकरण करून झाल्यावर पुन्हा खोदकाम हाती घेतल्याने यात कंत्राटदाराला दिलेले पैसे खड्ड्यांत गेले आहेत. कारण, पुन्हा खोदकाम केल्याने खड्डे भरावे लागणार असून त्याचा दर्जा व समतोल राखला जात नसल्याने रस्ता खचत असल्याचा नित्याचा अनुभव आहे. एकूणच महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत.