शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शहरामधील रस्ते ‘खड्ड्यांत’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:26 IST

उल्हासनगरातील नागरिकांचा खड्ड्यांतूनच प्रवास : लाखो रुपयांचा खर्च गेला पाण्यात

उल्हासनगर : पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्तीच न झाल्याने शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. नगरसेवक, नागरिकांनी ओरड केल्यानंतर ऐन पावसात रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ५० लाखांच्या निधीला आयुक्तांनी मान्यता दिली. मात्र, खड्ड्यांमध्ये विटा, दगडमातीचा भराव करून केवळ मलमपट्टी केल्याने प्रश्न सुटण्याऐवजी हे रस्तेच निसरडे झाले. त्यानंतर, केलेले डांबरीकरणही निघाल्यामुळे सर्वच रस्ते पुन्हा मूळ पदावर आले आहेत.

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान कोल्ड आणि हॉट मिक्सचा प्रयत्न फसल्यानंतर प्रत्येक प्रभागातील मुख्य चार रस्त्यांचे डांबरीकरण आणि खड्डे भरण्यासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद करून रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, हे काम निकृष्ट होऊ न नव्याने घातलेले डांबर निघून गेल्याने महापालिकेच्या रस्तादुरुस्तीवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.महापालिकेचा रस्त्यातील खड्डे भरण्याचा व डांबरीकरण करण्याचा प्रयोग फसल्यानंतर स्थायी समितीने मंजूर केलेल्या वाढीव निधीतून रस्त्याची दुरुस्ती सुरू केली. यावर किती निधी खर्च झाला, याची कल्पना बांधकाम विभागाचे प्रभारी शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता महेश शितलानी यांना नसल्याचे उघड झाले. एकूणच बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. यापूर्वीही बांधकाम विभाग अनेकदा वादात सापडला आहे. शितलानी यांच्या हकालपट्टीची मागणी सुरू झाली असून आयुक्त देशमुख काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्या खड्ड्यांमध्ये साचून राहिलेले पाणी यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरातून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊ न रस्त्यांची वस्तुस्थिती मांडली. यानंतर आयुक्तांनी रस्त्यांच्या दुरुस्तीचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.बहुतांश रस्त्यांची झाली दुरवस्थाशहरातील कॅम्प नं. ४, मोर्यानगरी, नेताजी चौक ते कालीमाता चौक, स्टेशन रोड रस्ता, व्हिनस चौक ते एसएसटी कॉलेज रस्ता, खेमानी रस्ता, हिराघाट रस्ता, कॅम्प नं. ३ येथील शांतीनगर ते डॉल्फिन हॉटेल रस्ता, गुलशननगर रस्ता, जुना बसस्टॉप रस्ता, व्हिनस चौक ते एसएसटी कॉलेज रस्ता, सुभाष टेकडीतील रस्ते आदी अनेक रस्ते खड्डेमय झाले. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे लहानेमोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर