शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा संघटनेमुळे दरूस्त होणार रस्ते

By admin | Updated: February 10, 2017 04:01 IST

शहरातील रिक्षा संघटना व वाहतूक पोलिसांनी महापालिकेस दिलेल्या निवेदनामुळे पालिकेल्या मिळालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरांतर्गत रहदारी

भिवंडी : शहरातील रिक्षा संघटना व वाहतूक पोलिसांनी महापालिकेस दिलेल्या निवेदनामुळे पालिकेल्या मिळालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरांतर्गत रहदारीचे नादुरूस्त रस्ते दुरूस्त केले जाणार आहेत. चार वर्षापासून पालिका कार्यालय ते मंडई, मंडई ते नझराना, मंडई ते धामणकरनाका या मार्गावरील बाजारपेठ, तीनबत्ती तसेच हनुमानबावडी ते निजामपूर पोलीस ठाणे, अशोकनगर, भंडारी कंपाऊंड, बाबला कंपाऊंड, पद्मानगर येथील रस्ते बनविताना पालिकेच्या बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने ठेकेदारांनी योग्यरित्या रस्ते बनविलेले नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा परिणाम या मार्गावरून जाणाऱ्या वाहन व रिक्षाचालकांना सहन करावा लागतो. तसेच वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. या बाबत नगरसेवक महासभेत प्रशासनास जाब विचारत नसल्याने रिक्षा संघटना व शहर वाहतूक पोलीस शाखा यांनी पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना लेखी पत्र देऊन शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी केली. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आयुक्त म्हसे यांनी प्रशासनाच्या वतीने शहरासाठी विकासनिधी द्यावा अशी मागणी केंद्र व राज्य सरकारकडे केली. त्यानुसार सरकारने १४ व्या वित्त आयोगातून १३ कोटीचा निधी पालिकेला दिला आहे. त्यामधून शहरातील रस्त्याचे पॅचवर्क,डांबरीकरणाचे काम आचारसंहिता संपल्यानंतर हाती घेणार असल्याची माहिती म्हसे यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)