शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:45 IST

मीरा-भार्इंदर पालिका : ३० टक्के जास्त दराने दिले होते कंत्राट

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : यूटीडब्ल्यू पद्धतीने कमी खर्चात व कमी वेळेत रस्त्याचे काम होत असताना मीरा-भार्इंदर महापालिकेने त्याच पद्धतीच्या नावाखाली रिद्धीका एंटरप्रायझेस या कंत्राटदारास तब्बल ३० टक्के जास्त दराने म्हणजे तीन कोटी ७१ लाखांना काम दिले. सहा महिन्यांच्या कामाला दीड वर्ष व्हायला आले, तरी काम रखडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अवास्तव दर, कामाला विलंब आणि निकृष्ट असल्याच्या गंभीर तक्रारींवर कारवाई करण्यास महापालिका टाळाटाळ करत आहे.प्रफुल्ल पाटील चौक ते विमल डेअरीपर्यंतचा रस्ता यूटीडब्ल्यूटी पद्धतीने करण्याच्या कामाचे कंत्राट ८ मार्च २०१९ ला रिद्धीका एंटरप्रायझेस या कंत्राटदारास दिले होते. पालिकेच्या अंदाजपत्रकानुसार या कामाची निविदेतील अंदाजित रक्कम दोन कोटी ८५ लाख ८८ हजार ६२७ रुपये इतकी होती. परंतु, पालिकेने कंत्राटदारास हे काम तब्बल २९.९० टक्के जास्त दराने म्हणजेच तीन कोटी ७१ लाख ३६ हजार इतक्या किमतीला दिले आहे. या कामाची मुदत सहा महिन्यांची म्हणजेच ७ सप्टेंबर २०१९ पर्यंतची असताना दीड वर्ष झाले तरी काम अजून अपूर्णच आहे. पालिका मात्र सोयीस्कर भूमिका घेत कंत्राटदाराला पाठीशी घालत मुदतवाढ देत आहे. सुरक्षा अनामत रक्कम पाच टक्के घ्यायची असताना केवळ तीन टक्केच घेतली. मुळात कंत्राटदारास या कामाचा अनुभव नसताना काम दिले, अशा तक्रारी आहेत.रस्ता खणून ठेवल्याने नागरिकांना येजा करणे जिकिरीचे बनले होते. धूळ व खडीतील पावडरने त्रासले होते. आताही ठिकठिकाणी काम अपूर्णच आहे. पालिका अधिकारी व तांत्रिक सल्लागार जागेवर नसताना कंत्राटदाराने काम सुरू केले आहे. गटारांतील सांडपाणी कामासाठी वापरले असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते इरबा कोनापुरे व प्रवीण परमार यांनी पालिकेसह सरकारकडे केली आहे. या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी या दोघांनी केली आहे.कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे दीड वर्ष झाले, तरी काम पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कंत्राटदारावर कारवाई करून कंत्राट रद्द करावे. निविदा व कामाची चौकशी केली पाहिजे.- तारा घरत, नगरसेविकायाबाबतच्या आलेल्या तक्रारींची शहानिशा केली जाईल. त्यानुसार, आवश्यक असेल ती कार्यवाही केली जाईल.- शिवाजी बारकुंड,शहर अभियंता, भार्इंदर मनपा