शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वरसावे जेट्टीचा रस्ता, नागरी सुविधांच्या कामास सीआरझेडची मंजुरी; जलवाहतुकीचे मध्यवर्ती केंद्र ठरणार 

By धीरज परब | Updated: October 31, 2023 19:11 IST

Mira Road: वरसावे नाका येथील खाडी किनारी प्रवासी वाहतुकीच्या जेट्टी साठी रस्ता व नागरिकांच्या विरंगुळा व सुविधेसाठीच्या कामांना सीआरझेड प्राधिकरणाने मंजुरी दिल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे .

मीरारोड - वरसावे नाका येथील खाडी किनारी प्रवासी वाहतुकीच्या जेट्टी साठी रस्ता व नागरिकांच्या विरंगुळा व सुविधेसाठीच्या कामांना सीआरझेड प्राधिकरणाने मंजुरी दिल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे . सदर घोडबंदर - वरसावे जेट्टी हि जलवाहतुकीचा पर्याय व व मध्यवर्ती केंद्र ठरणार असे ते म्हणाले.

वरसावे नाका हा घोडबंदर मार्ग - ठाणा व राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबईला  रस्ते मार्गाने जोडणारे मुख्य जंक्शन आहे . त्याच प्रमाणे जलवाहतुकी द्वारे मीरा भाईंदर , वसई - विरार , ठाणे , नवी मुंबई व मुंबई आदी शहरे जोडण्यासाठी येथील खाडी किनारी जेट्टी आधीच विकसित कारण्यात आली आहे . मात्र जेट्टी कडे जाणारा १२ मी रुंद रस्ता ,  तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकी , प्रवाश्याना बसण्यासाठी शेड, पार्किंग एरिया अशा सुविधा तयार केल्या जाणार आहेत.  परिसरात उद्यान तयार करून सुशोभीकरण , लहान मुलांना खेळण्यासाठी जागा , कॅफेटेरिया सुद्धा प्रस्तावित आहे.

मेरी टाइम बोर्डाने विविध कामांना परवानगी देऊन मीरा भाईंदर महापालिकेने देवगिल निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती . मात्र सीआरझेड प्राधिकरणाची परवानगी प्रलंबित होती . आता सीआरझेड परवानगी मिळाल्याने १० कोटी निधी खर्च करून जेट्टी परिसरातील सोयी सुविधा निर्मितीचे काम लवकरच सुरु होईल. पुढील वर्षाच्या पावसाळ्या आधी हि सर्व कामे पूर्ण केली जातील असे आ.  सरनाईक म्हणाले.

घोडबंदर - वरसावे प्रवासी जेट्टी हि जल वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र ठरणार आहे . मीरा भाईंदर , मुंबई , वसई - विरार , ठाणे आदी प्रमुख शहरांना जोडणारी हि मध्यवर्ती जेट्टी असून नागरिकांना जल वाहतुकी द्वारे काही मिनिटात पोहचता येणार आहे . नागरिकांना जल वाहतुकीचा चांगला पर्याय मिळणार आहे . गेली दोन वर्ष याचा पाठपुरावा चालवला होता . यामुळे रस्ता , रेल्वे वरचा ताण कमी होईल अशी आशा आ . सरनाईक यांनी व्यक्त केली . 

टॅग्स :mira roadमीरा रोड