शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

रस्ते विकासाचा मार्ग अखेर झाला मोकळा

By admin | Updated: March 24, 2017 01:04 IST

केडीएमसीच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या महासभेत सादर केलेल्या ४२० कोटींच्या रस्ते विकासाच्या प्रस्तावाला तत्कालीन स्थायी

कल्याण : केडीएमसीच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या महासभेत सादर केलेल्या ४२० कोटींच्या रस्ते विकासाच्या प्रस्तावाला तत्कालीन स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. परिणामी, रस्ते विकासाच्या कामांना पुरती खीळ बसली होती. परंतु, आता या प्रस्तावाला दिलेली स्थगिती उठवण्यात आली आहे. सरकारच्या नगरविकास विभागाने तसे पत्र आयुक्त ई. रवींद्रन यांना पाठवले आहे. स्थगिती उठल्यामुळे एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. कल्याण-डोंबिवली शहरांचा स्मार्ट शहरांच्या यादीत समावेश झाला आहे. त्यानुसार, शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि चौकांचे सुशोभीकरण करण्याची योजना आयुक्त रवींद्रन यांनी आखली आहे. शहरांचे झपाट्याने होणारे शहरीकरण, परिणामी होणारी वाहतूककोंडी यावर उपाय म्हणून पाच वर्षांत शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत अशा एकूण ८७ रस्त्यांच्या केल्या जाणाऱ्या या विकासकामांसाठी ४२० कोटींचा प्रस्ताव रवींद्रन यांनी सप्टेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी दाखल केला होता. हे रस्ते पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, तत्कालीन सभापती गायकर यांनी या प्रस्तावाची गंभीर दखल घेतली. अंदाजपत्रकात तरतूद नसताना सादर केलेल्या प्रस्तावाबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. याची दखल घेत या प्रस्तावाला नगरविकास विभागाने स्थगिती दिली होती. ४२० कोटींच्या प्रस्तावावरून शिवसेना-भाजपामधील बेबनाव समोर आला होता. या सत्ताधाऱ्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात रस्ते विकासाच्या कामांना खोडा बसल्याने बहुतांश नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, स्थगिती उठवावी, यासाठी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी सरकारदरबारी पाच स्मरणपत्रे पाठवली होती. त्याचबरोबर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री फडणवीस आणि नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन चर्चा केली होती. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही स्थगिती उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याबाबत विनंती केली होती. अखेर, सहा महिन्यांनंतर का होईना, केडीएमसीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ४२० कोटी रुपयांच्या संबंधित रस्ते विकास प्रकल्पाच्या प्रस्तावाला दिलेली स्थगिती उठवली आहे. नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी श्रीकांत जांभवडेकर यांनी स्थगिती उठवल्याबाबतचे पत्र आयुक्त रवींद्रन यांना पाठवले. (प्रतिनिधी)