शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

नाल्यावरील रस्ताही ‘श्रेया’ने बाधित

By admin | Updated: November 15, 2016 04:34 IST

आधी मोठ्या प्रकल्पाच्या कामावरून शिवसेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला होता. परंतु, आता नाल्यावरील पादचारी रस्त्याच्या कामाच्या

ठाणे : आधी मोठ्या प्रकल्पाच्या कामावरून शिवसेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला होता. परंतु, आता नाल्यावरील पादचारी रस्त्याच्या कामाच्या किरकोळ श्रेयवादावरून शिवसेना-भाजपामध्ये खडाजंगी सुरू झाली आहे. मुलुंड हद्दीजवळील नाल्यावर पादचारी रस्ता बनवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्यासाठी एक कोटी ४० लाखांची तरतूद करण्यात आली. त्याचे भूमिपूजनदेखील झालेले आहे. परंतु, आता शिवसेनेने याच कामाचे फलक लावून हे काम आमदार निधीतून मंजूर झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता या भागात तणावाचे वातावरण असून शिवसेना-भाजपा हे सत्ताधारी मित्रपक्ष पुन्हा आमनेसामने आले आहेत. मागील २७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रभाग क्रमांक ३२ मधील भटवाडी येथील मुलुंड हद्दीलगत वाहणाऱ्या नाल्याचे श्रीनगर मेला बार, निशिगंध सोसायटी, काळूशेठ चाळ, प्रियदर्शनी बिल्डिंगमार्गे तानसा जलवाहिनीपर्यंत आरसीसी पद्धतीने बांधकाम करून मेला बार ते प्रियदर्शनी बिल्डिंगपर्यंत स्लॅब टाकून पादचारी रस्ता बनवण्याचा प्रस्ताव पाठपुरावा करून मंजूर करून घेतला असल्याचा दावा तत्कालीन नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी केला आहे. या कामासाठी ठामपाने २०१५-१६ साठी एक कोटी ४० लाखांची तरतूद केली आहे. तर, २०१६-१७ मध्ये यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. २० जानेवारी २०१६ च्या महासभेत यासंदर्भातील ठराव सर्वानुमते मंजूरही झाला असल्याचे त्यांचे म्हणणे असून त्याची निविदा प्रक्रि याही मे महिन्यात पूर्ण झाली होती. परंतु, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भूमिपूजन रखडले. त्याचे उद्घाटन शनिवारी भाजपाचे ठाणे विभागीय उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी तेथील सध्याच्या नगरसेविका स्वाती देशमुख आणि नागरिकांच्या उपस्थितीत केले. मात्र, सोमवारी शिवसेनेने पुन्हा भूमिपूजन करीत या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप घाडीगावकर यांनी केला. विशेष म्हणजे रविवारी महापौर संजय मोरे यांच्या हस्ते आणि सेना नगरसेवकांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदारांच्या निधीतून काम झाल्याचा फलक लावून त्यांनी नागरिकांची दिशाभूल केल्याचेही घाडीगावकर यांनी म्हटले आहे. महापालिकेने एखादा प्रस्ताव मंजूर करून त्यासाठी तरतूद केली असेल, तर त्याच कामासाठी आमदार निधी कसा मिळू शकतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या आमदार निधीबाबत झालेल्या कार्यवाहीचे दस्तऐवज जनतेसमोर जाहीर करावेत, असे आव्हान घाडीगावकरांनी दिले आहे. अशाच पद्धतीने जय भवानीनगर ते श्रीनगर जलकुंभाकरिता थेट जलवाहिनीचे भूमिपूजन सेनेने खोटेपणाने केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)