शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरच्या ‘त्या’ रस्त्याचे डांबरीकरण

By admin | Updated: April 19, 2017 00:24 IST

बदलापूर बस डेपो ते गांधीनगर झोपडपट्टीतून जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण अनेक वर्षापासून रखडले होते. जागेच्या वादामुळे हा रस्ता

बदलापूर : बदलापूर बस डेपो ते गांधीनगर झोपडपट्टीतून जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण अनेक वर्षापासून रखडले होते. जागेच्या वादामुळे हा रस्ता तयार होण्यास विलंब होत होता. मात्र स्थानिक नगरसेवकाच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर या रस्त्याचे काम पालिकेने तत्काळ पूर्ण केले. हा रस्ता जागेच्या वादातून रखडल्याने तयार करण्यासाठी पालिकेने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बदलापूर पश्चिम भागात हेंद्रेपाडा मांजर्ली आणि रमेशवाडी या भागात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दोन ते अडीच वर्षापासून हे काम रखडल्याने नगरसेवक किरण भोईर सातत्याने पाठपुरावा करत होते. हा रस्ता १७ एप्रिलपर्यंत पूर्ण न केल्यास प्रशसानाच्या विरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानंतर नगरपालिका प्रशसानाने तातडीने पावले उचलत रस्त्याचे काम पूर्ण केले. स्थानिकांचा विरोध असल्याने रस्त्याचे काम रखडल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते होते. मात्र या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत हा रस्ता तातडीने करण्याचे आदेश पालिकेला दिल्यावर पोलीस बंदोबस्तात करण्यात आला. हा रस्ता तयार झाल्याने स्टेशनमार्गे जाणारी वाहतूक या रस्त्यावरुन फिरण्यास मदत होणार आहे. दीड वर्षापासून हा रस्ता तयार व्हावा यासाठी भोईर हे सतत पाठपुरावा करत होते. मात्र विकास आराखड्यातील रस्ता आणि वापरातील रस्ता हा वेगळा असल्याने त्या रस्त्याचे काम करण्यात अडचणी येत होत्या. (प्रतिनिधी)