शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

डोंबिवलीतील रस्ता झाला गुलाबी; प्रदूषण नसल्याचा ‘कामा’ संघटनेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:42 IST

डोळे चुरचुरण्याच्या तक्रारी

डोंबिवली : रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे डोंबिवली शहर नेहमीच चर्चेत असते. मात्र, मंगळवारी एमआयडीसीतील फेज २ मधील एक रस्त्यावर रासायनिक पदार्थ सांडल्याने तो गुलाबी, लाल रंगाचा झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी उग्र दर्प येत असल्याच्या तसेच डोळे चुरचुरणे यासारखा त्रास झाल्याच्या तक्रारी केल्या. दरम्यान, हे प्रदूषण नसल्याचा दावा कारखानदारांच्या ‘कामा’ संघटनेने केला आहे.

शहरातील एमआयडीसी परिसरात अनेक रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून वायुप्रदूषण तसेच सांडपाणी प्रक्रिया न करताच रासायनिक सांडपाणी खुलेआम सोडून देणे यासारखे प्रकार सुरू असतात. यासंदर्भात तेथील नागरिकांनी वारंवार एमआयडीसी तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडेही तक्रारी केल्या आहेत. त्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

प्रदूषणामुळे काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा, भगव्या रंगाचा तेल मिश्रित पाऊस पडला होता. त्यात आता एमआयडीसीतील एक रस्ता रसायन पडल्याने गुलाबी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात लाल पाणीही दिसून आल्याने नागरिकांमध्ये एकच चर्चा झाली. दरम्यान, गुलाबी रस्त्यांसंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.गुलाल बनवण्यासाठी गुलाबी रंगाचे उत्पादन करणारी कंपनी २०१० मध्येच बंद झाली. मंगळवारी रस्त्यावर गुलाबी रंग दिला. मात्र, तेथे गटाराच्या बांधकामसाठी केलेल्या खोदकामातील माती लाल रंगाची निघाली होती. या मातीचा परिसरातील पाण्याशी संपर्क झाला. त्यामुळे रस्त्यावर गुलाबी रंग दिसू लागला. त्यामध्ये रासायनिक प्रदूषणाची घटना नाही.- देवेन सोनी, अध्यक्ष कामा संघटना

टॅग्स :MIDCएमआयडीसीdombivaliडोंबिवलीthaneठाणे