शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

भिवंडीतील रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:39 IST

नागरिकांचा आरोप : आयआयटी तज्ज्ञांद्वारे तपासणीनंतरच बिल काढण्याची मागणी

भिवंडी : वर्षभरापासून शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पावसाळा तोंडावर आल्यानंतर धडपड सुरू झाली आहे. नगरसेवक आपापल्या वॉर्डांत रस्तेदुरुस्तीचे काम हाती घेऊ न त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करताना खासगी ठेकदारांकडून निकृष्ट दर्जांच्या रस्तेकामांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. हे रस्ते पावसाळ्यात वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून पालिका आयुक्तांनी विविध भागांत झालेल्या डांबरीकरणाची पाहणी करून आयआयटीच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून ठेकेदारांना बिल अदा करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

शहरातील प्रभाग समिती क्र. १ ते ५ मधील बहुतांश अंतर्गत रस्त्यांची वर्षभरापासून दुरवस्था झालेली आहे. केवळ विविध मिरवणुकांच्या मार्गांवरील रस्ते आणि मंत्र्यांच्या स्वागतासाठी नव्याने रस्ते बनवण्यात आले आहेत. महापालिकेच्या महासभेने निवडणुकीपूर्वी १५ कोटी रस्तेदुरुस्तीसाठी मंजूर केले होते.

पालिकेच्या बांधकाम विभागाने खाजगी ठेकेदारामार्फत शहरातील जुना ठाणे रोड, बंदर मोहल्ला, दर्गा रोड, शांतीनगर, गैबीनगर, कल्याण रोड, निजामपुरा, बंगालपुरा, समदनगर, कुंभारआळी, ब्राह्मणआळी, सौदागर मोहल्ला, मानसरोवर रोड आदी ठिकाणच्या खराब झालेल्या रस्त्यांवर पॅचवर्क व डांबरीकरणाचे काम ठेकेदारामार्फत सुरू करण्यात आले आहे.हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने रात्री दुरुस्त केलेला रस्ता दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी उखडलेला दिसत आहे. रस्तेदुरुस्तीवेळी बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता व प्रभाग अधिकारी उपस्थित नसल्याने काही ठेकेदारांनी रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची व काळे ऑइल डांबर वापरून केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

पावसाळ्यात रस्ते वाहून जाण्याची भीतीकामे निकृष्ट दर्जाची असल्याने रस्ते पहिल्याच पावसात वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामांची बिले पाऊस सुरू होण्याआधीच मिळवण्यासाठी ठेकेदार बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून मिळवण्यासाठी घाई करत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी शहरातील रस्ता डांबरीकरणाच्या कामाची सरकारी संस्था आयआयटीमार्फत तपासणी करूनच बिल द्यावे, अशी मागणी आमदार शांताराम मोरे यांनी केली आहे.