शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता खचल्याने वाहतूक केली बंद; दीड महिन्यापासून परिस्थिती जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:16 IST

मुंबई पालिकेची जलवाहिनी जाते जवळून;

आसनगाव : मागील दीड महिन्यांपासून मुंबई महापालिकेच्या पाइपलाइन जवळचा रस्ता खचला असून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. पर्यायी रस्ता सुरू करण्यात आला आहे, मात्र तो सुस्थितीत नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मुंबई पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.शहापूर - तानसा - अघई रस्त्यावर पालिकेच्या पाइपलाइन जवळच्या रस्त्याचा स्लॅब ड्रेन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी रस्ता काढण्यात आला आहे. परंतु पर्यायी रस्ता सुस्थितीत नसल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. या रस्त्यावरून गुजरात ते नाशिक अशी जड वाहनांची वाहतूक होत असल्याने हा स्लॅब खचला, असल्याचे समजते.पाइपलाइनच्या रस्त्यावर ही वाहतूक सोडणे चुकीचे असताना ती सोडली कशी जाते ? असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. एक ते दीड महिन्याचा कालावधी उलटूनही काम केलेले नाही.सातत्याने वाहनांची ये-जा या मार्गावर रोज शेकडो वाहने धावतात. हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. हा रस्ता मुंबई- नाशिक, मुंबई गुजरात या रस्त्याला जोडणारा आहे.दळणवळणाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे जड वाहतूक या रस्त्यावरून करणे योग्य नाही. हा रस्ता मुंबई पाकिकेच्या मालकीचा असल्याने त्याची देखभाल दुरु स्तीची जबाबदारीही त्यांची आहे.