शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील रस्त्याची चाळण

By admin | Updated: November 18, 2016 02:38 IST

कल्याण पूर्वेतील केडीएमसीच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोरीस रहदारीच्या रस्त्याची चाळण झाली आहे.

कोळसेवाडी : कल्याण पूर्वेतील केडीएमसीच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोरीस रहदारीच्या रस्त्याची चाळण झाली आहे. काँक्रिटच्या रस्त्यात काही ठिकाणी केलेल्या डांबरीकरणाला खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीचे प्रमाण वाढले आहे.पुणे लिंक रोडवरील श्रीराम टॉकीज ते सूचकनाका या ३,७०० मीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम नोव्हेंबर २०११ पासून सुरू आहे. या प्रकल्पासाठी २९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत २४ कोटी ७६ लाख खर्च झाले आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होणारी बेकायदा बांधकामे व प्रशासकीय दिरंगाई, यामुळे अजूनही रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तीसगावाला, चक्कीनाका सर्कल, मालवण हॉटेल, नितीन राज हॉटेल व विठ्ठलवाडी स्मशानभूमीसमोरील रस्ता, श्रीराम टॉकीजचा रस्ता आदी भागांतील रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र, ते बुजवण्यात कंत्राटदार टाळाटाळ करत आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात विद्युत जनित्रे, बाधित इमारतींचा अडथळा आहे. ते वगळता काँक्रिटच्या रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती कनिष्ठ अभियंता एस.डी. केदार यांनी दिली आहे. पुणे लिंक मार्गावरील १९ पैकी १३ जनित्रे हटवली आहेत, तर २२ बाधित इमारतींपैकी ३ पाडल्या आहेत, अशी माहिती प्रभागक्षेत्र अधिकारी शांतिलाल राठोड यांनी दिली.‘ड’ प्रभागक्षेत्र कार्यालय ते उड्डाणपुलापर्यंतचा भाग खडकाळ आहे. जलकुंभ, भूमिगत जलवाहिन्या, रहदारी व इमारती असल्यामुळे स्फोटतंत्राचा वापर करणे शक्य नाही. त्याऐवजी डांबरीकरण किंवा पेव्हरब्लॉक टाकून रस्त्याची दुरुस्तीचे नियोजन आहे. अन्य भागात काँक्रिटीकरण, जलवाहिन्या व मलवाहिन्यांमुळे रखडले आहे. (वार्ताहर)