शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा बंदमुळे उल्हासनगरात हाल, रस्त्यांच्या दुरवस्थेचा चालकांकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:12 IST

रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ विविध रिक्षा संघटनांनी रिक्षा बंदची हाक दिल्याने सोमवारी चाकरमान्यांसह, नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले

उल्हासनगर : रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ विविध रिक्षा संघटनांनी रिक्षा बंदची हाक दिल्याने सोमवारी चाकरमान्यांसह, नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. रस्त्यांच्या दुरवस्थेला पालिकाच जबाबदार असल्याचा ठपका रिक्षा चालकांनी ठेवला. पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या आश्वासनानंतर सायंकाळी हा बंद मागे घेण्यात आला.उल्हासनगर महापालिकेने पावसाळयापूर्वी आणि नंतर रस्त्याची दुरस्ती केलेली नाही. त्यामुळे सर्व रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याबाबत वारंवार निवेदने देऊनही फरक न पडल्याचा आरोप करत रिक्षा संघटनांनी सोमवारी मध्यरात्रीपासूनच रिक्षा बंद ठेवल्या. शहीद मारोती जाधव चालक-मालक रिक्षा संघटना, रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनसह इतर रिक्षा संघटना यात सहभागी झाल्या होत्या. दिवाळीच्या सुट्या संपून शाळेत निघालेले विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, बाहेरगावाहून आलेले प्रवासी यांना या बंदचा फटका बसला. बंदमुळे उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि शहाड रेल्वे स्टेशनवर रिक्षा बंदमुळे शुकशुकाट होता.रिक्षा संघटनेचे राजा पाटील, रवींद्रसिंग भुल्लार यांच्यासह इतर संघटनांचे नेते, पदाधिकाºयांनी पालिका आयुक्तांशी चर्चा केली आणि मागण्या मांडल्या. पालिकेने रस्ता दुरस्तीसह खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. राज्य सरकारच्या निधीतून विविध रस्त्यांचे काम सुरू आहे, असे सांगत आयुक्तांनी रस्ते सुस्थितीत ठेवण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर हा बंद मागे घेण्यात आला.