शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरसी’त रोखला रस्ता

By admin | Updated: April 24, 2016 02:12 IST

एनआरसी कंपनी क्वार्टर्समधील वीज आणि पाणीपुरवठा आठवड्यापासून बंद असल्यामुळे आक्रमक झालेल्या रहिवाशांनी शनिवारी तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला.

म्हारळ : एनआरसी कंपनी क्वार्टर्समधील वीज आणि पाणीपुरवठा आठवड्यापासून बंद असल्यामुळे आक्रमक झालेल्या रहिवाशांनी शनिवारी तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला. तीन दिवसांपूर्वीच संतप्त महिलांनी कल्याणला महापालिका मुख्यालयात धडक दिली होती. मात्र, त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने शहाड-मोहने वाहतूक रोखून धरली.एनआरसी कंपनी आणि कामगारांत गेली काही वर्षे देण्यांवरून संघर्ष सुरू आहे. न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. त्यामुळे कंपनी आणि कामगारांत सतत संघर्ष सुरू असतो. देणी न मिळाल्याने अनेक कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत रहिवासी कंपनीच्या क्वार्टर्समध्येच राहत आहेत. कंपनी कामगारांना कंपनीच्या क्वार्टर्समधून काढण्यासाठी वीज-पाणी बंद करण्याचा स्टंट करीत असल्याचा कामगारांचा आरोप आहे. कंपनीची जवळपास सहा कोटींची वीज थकबाकी असल्यामुळे महावितरणने वसाहतीसह कंपनीचा वीजपुरवठा खंडित केला आणि त्यातून पाणी उपसले जात नाही. वीजही नाही, त्यात पाणी नसल्याने आठवडाभर रहिवाशांचे हाल सुरू आहेत. टॅँकरही वेळेवर मिळत नसल्यामुळे एनआरसी कॉलनीतील संतप्त महिलांनी अखेर मोहने येथे रास्ता रोको आंदोलन केले.मूलभूत गरजा पुरवा न्यायालयात प्रकरण असल्याने एकही लोकप्रतिनिधी आंदोलनकर्त्यांकडे फिरकला नाही. समस्यांकडे कोणीही पाहत नसल्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी प्रचंड उद्रेक पाहावयास मिळाला. ‘आम्ही फक्त आमच्या मूलभूत गरजा मागत आहोत, तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल, तर टाका,’ असेही काही महिलांनी पोलिसांना सांगितले. पोलीस अधिकारीही त्यांना या मागण्यांसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत होते. परंतु, संतप्त महिला रस्त्यावरून उठण्यास तयार नव्हत्या. जवळपास १५०० ते १६०० कुटुंबे या कॉलनीत राहतात.जगायचे कसे?कॉलनीमध्ये लहान मुले आजारी पडत आहेत. कावीळ, टायफॉइडमुळे त्रस्त आहेत. गेले आठ दिवस झाले. लाइट नाही, पाणी नाही. आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न पडलाय.- नीतू सिंग, गृहिणी, एनआरसी कॉलनीकंपनीची जबाबदारीएनआरसी कंपनीने रहिवाशांचे हे प्रश्न सोडवायला हवेत. ती त्यांची जबाबदारी आहे. कंपनीची जवळपास सहा कोटींची थकबाकी आहे.- भारत पवार, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, कल्याण