शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

माळशेजमध्ये धुक्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:29 IST

अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यामुळे दरडी कोसळण्याची भीतीदेखील कमी झाली.

सुरेश लोखंडे ठाणे : कल्याण - अहमदनगर या राष्टÑीय महामार्गावरील माळशेज घाटात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यामुळे दरडी कोसळण्याची भीतीदेखील कमी झाली. मात्र, धुक्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. दिवसादेखील समोरचे वाहन दिसत नसल्यामुळे हेडलाईटचा वापर करावा लागत आहे. चालकांना समोरच्या वाहनाच्या अंदाजाने घाट पार करण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.हेड लाईटचा प्रकाश प्रखर असतानाही या दाट धुक्यांमध्ये तो मंदावलेला आहे. बहुतांशी वाहनासाठी लाल लाईटचा वापरण्यात येतात. मात्र, घाटातील धुक्यांमध्ये ते काम करीत नाहीत. त्या प्रकाशात दिवसाही समोरचे दिसत नसल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रात्री तर जीव मुठीत घेऊन या घाटातील धुक्यांमधून प्रवास करावा लागत असल्याच्या गंभीर समस्येस चालकांना भेडसावतेय. या दाट धुक्यांच्या अंधारात पिवळे लाईट उपयुक्त ठरत आहेत. त्यांच्या प्रखर प्रकाशामुळे धुक्यांचा अंधार चिरून चालकांना काही अंशी रस्त्याचा भाग दिसत आहे. पण सध्या माळशेज घाटातील वाहन चालकास पुढच्या वाहनाचा आधारावर घाटातून प्रवास करावा लागत असल्याचे चालकांकडून सांगितले जात आहे.यंदा दरडी कोसळल्या नाहीत. पण पावसाचा जोर पाहून वाहतूक बंद करावी लागली. तर पर्यटकांनादेखील घाटात जाण्यास मज्जाव केला होता. मात्र, आता पाऊस काही अंशी कमी होऊन दरड कोसळण्याचे संकट टळले. पण दाट धुक्यांचा अंधार जीवघेणा ठरत आहे. याशिवाय उंच कड्यावरून ओहळाच्या पाण्याची धार रस्त्यावर पडत आहेत. त्याखालून वाहनेदेखील जात असून त्यांच्या टपावर पाण्याची धार आदळत आहे.कल्याण - अहमदनगर या राष्टÑीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्या तृप्ती नाग यांच्याशी या समस्ये विषयी चर्चा केली असता धुक्याच्या समस्येवर पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. पण रस्त्यांच्या ठिकठिकाणी, वळणावळणांवर पांढरे पट्टे, पिवळे फ्लॅश बोर्ड, पट्टे, सूचनाफलक, धोक्याचे वळण दर्शवणारे बोर्ड मोठ्याप्रमाणात लावले आहेत. घाटात सुरक्षा गार्ड, पोलिसांची पेट्रोलिंग सुरू आहे. क्रेन वाहनही ठिकठिकाणी असल्याचे नाग यांनी ‘लोकमत’ला सांगितले.प्रवासाची धास्तीघाटमार्गात जवळपास १३ ठिकाणी छोट्या दरडी गेल्या वर्षी कोसळल्या होत्या. त्यातून तेल वाहतूक करणारा ट्रक पडला होता. त्याच्या चालकाचा शोध अद्यापही लागलेला नाही. क्लिनरचा मृतदेह चार दिवसांनी सापडला होता. आताही धुक्याचा अंधार घाटातील प्रवासाला घातक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.