शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य, वागळे आणि मुंब्य्रातील वाढते रुग्ण, पालिकेला ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 17:22 IST

लोकमान्य नगर आणि वागळे इस्टेट, मुंब्रा पटयात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यावर कसे उपाय योजावेत असा पेच पालिकेला पडला आहे. येथील रुग्णांची संख्या वाढत असून ती आता ५४० च्या पार गेली आहे.

ठाणे : दिवसेंदिवस ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु असे असले तरी आता ठाण्यातील लोकमान्य नगर, वागळे इस्टेट आणि मुंब्य्रात रुग्णांची वाढणारी संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. लोकमान्य आणि वागळे इस्टेट हा पटटा अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आला आहे. असे असले तरी या भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकमान्य नगर भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २०० च्या पार झाली आहे. तर वागळे इस्टेट भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही पावणे दोनशे आणि मुंब्य्राची संख्या ही १५० च्या घरात आली आहे. येथील परिसर हा संपूर्णपणे झोपडपटटीचा असल्याने त्यावर उपाय योजना कशा करायच्या असा पेच पालिकेला सतावू लागला आहे.               ठाणे शहराचा आजचा विचार केला तर या तीनही प्रभागात मिळून तब्बल ५४० च्या आसपास रुग्ण हे कोरोना बाधीत झाल्याचे दिसून आले आहे. मार्च, एप्रिल महिन्यात या भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही कमी होती, मात्र मागील १५ दिवसात या भागात रुग्णांची संख्या ही गुणाकाराने वाढतांना दिसत आहे. लोकमान्य नगर भागात तर रोज नवीन १० ते २० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ही संख्या कमी कशी करायची कोणत्या उपाय योजना करायच्या असा पेच पालिकेला सतावू लागला आहे. आजच्या घडीला या भागात २३० कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तिकडे वागळे इस्टेट भागातही कोरोनाचे १६७ हून अधिक रुग्ण आहेत. तसेच मृत्यु पावलेल्यांमध्येही याच पटटातील नागरीकांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. हा भाग पूर्णपणे दाटीवाटीचा आणि गर्दीचा भाग आहे. घराला लागून घरे असून झोपडपटटीने हा भाग व्यापला गेला आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रार्दुभाव वेगाने होताना दिसत आहे. त्यात मागील काही दिवसापूर्वी लोकमान्य नगर आणि वागळे प्रभाग समितीमधील अत्यावश्यक सेवेतील दुकानेही आता अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली आहेत. असे असतांनाही आता या भागातील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आजही नागरीक सर्व सेवा बंद असतांनाही रस्त्यावर विनाकारण फिरतांना दिसत आहेत. पालिका आणि पोलीसांकडून देखील नागरीकांना वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनही हतबल झाले आहे. दुसरीकडे मागील काही दिवस मुंब्य्रातील कोरोनाबाधीतांची संख्या ही कमी वाटत होती. मात्र मागील चार ते पाच दिवसात पुन्हा येथील रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेच्या १० प्रभाग समितीत मिळून ९१३ रुग्ण असून आतापर्यंत पावणे तीनशे रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. परंतु असे जरी असले तरी शिल्लक राहिलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधीक रुग्ण हे लोकमान्य नगर, वागळे आणि मुंब्य्रात ५३४ हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या