शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

न्यायप्रविष्ट काळूधरण सध्या तरी शक्य नाही

By admin | Updated: March 7, 2016 02:18 IST

काळू धरणासाठी कोणत्याही प्रकारच्या मान्यता नसताही ते बांधायला निघालेल्या पाटबंधारे विभागाची सध्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडूनझाडाझडती सुरू आहे.

सुरेश लोखंडे ,ठाणेकाळू धरणासाठी कोणत्याही प्रकारच्या मान्यता नसताही ते बांधायला निघालेल्या पाटबंधारे विभागाची सध्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडूनझाडाझडती सुरू आहे. त्या आधी बनावट डिझाईन व नकाशाद्वारे बांधकाम हाती घेतलेल्या या धरणाच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयीन पातळीवर कोणत्याही हालचाली नसताना न्यायप्रविष्ट धरण बांधण्याच्या वल्गना करून जलसंपदा मंत्री व पालकमंत्री ठाणेकरांची दिशाभूल करीत असल्याचे या धरणाविरोधातील सक्रीय संघटनांकडून सांगितले जात आहे.संभाव्य काळू धरण दोन हजार १९९ हेक्टरवर शेतजमिनीसह वन जमिनीवर बांधले जाणार आहे. पण अद्याप महसूल विभागाकडून या जमिनीचे संपादनही केलेले नाही, धरणाचे मूळ डिझाईन, स्ट्रक्चरला डिझाईन आदी नाशिकच्या सरकारी इंस्टिट्युटचे कोणतेही नकाशे नसतानाही त्यचे काम एफ. ए. कन्स्ट्रक्शनस्् कंपनीने सुरू केले होते. एमएमआरडीएच्या मालकीच्या या धरणावर सुमारे दीड ते दोन वर्षात ११२ कोटी खर्च झालेले आहे. त्यातून सुमारे २० टक्के काम झाल्याचे सांगितले जात असतानाच पाटबंधारे विभागाच्या काही अभियंत्यासह ठेकेदार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या चक्रव्युहात सापडले आहेत. या धरणाचे काम सुरू करण्याचे सांगून न्यायालयीन आदेशाचा अवमान जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व पालकमंत्री एकनाथ शिंदे करीत असल्याची जाणकारांमध्ये चर्चा आहे. जिव्हाळ्याच्या पाणीटंचाईवर नागरिकांची मनधरणी करण्यासाठी अन्य मार्ग असताना अन हा विषय न्यायप्रविष्ट असतानाही काळू धरण बांधण्याची वाच्यता या जबाबदार मंत्र्यांनी करणे योग्य नसल्याचे धरणग्रस्तांचे म्हणणे आहे. मुळात या धरणासाठी भूसंपादान झालेले नाही. वन विभागाची मान्यता नाही, आठ ग्रामपंचायतींचे बोगस ठराव असल्याचे न्यायालयाने आधीच उघड केले आहे. नवीन कायद्यानुसार या धरणामुळे होणारे ‘सामाजिक परिणाम ’ अहवाल अद्यापही तयार नाहीत. नष्ट होणाऱ्या वनसंपदेबाबत वन खात्याची सहमती नाही. असे असतानाही धरणाचे काम कसे सुरू होणार, धरण बांधण्याच्या या केवळ भूलथापा असल्याचे या काळू धरणा विरोधात जनहित याचिका दाखल करून स्थगिती मिळवणाऱ्या श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी लोकमतला सांगितले.