शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा युनियनचा अ‍ॅपला सक्त विरोध

By admin | Updated: July 16, 2017 02:54 IST

ओला आणि उबेरच्या धर्तीवर प्रवाशांना आॅनलाइन रिक्षा बुक करता येईल, असे अ‍ॅप महापालिका तयार करीत आहे. या अ‍ॅपमुळे शहरात अधिकृत रिक्षा किती आहेत, हे उघड

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ओला आणि उबेरच्या धर्तीवर प्रवाशांना आॅनलाइन रिक्षा बुक करता येईल, असे अ‍ॅप महापालिका तयार करीत आहे. या अ‍ॅपमुळे शहरात अधिकृत रिक्षा किती आहेत, हे उघड होणार असून यामुळे अनधिकृत रिक्षांचा गोरखधंदा बंद होणार आहे. त्यामुळे या अनधिकृत रिक्षांच्या धंद्यावर गब्बर झालेल्या काही युनियनवाल्यांनीच या अ‍ॅपला विरोध करून काही झाले तरी ते सुरू होऊ न देण्याचा इशारा दिला आहे. ओला आणि उबेरच्या धर्तीवर सुरू करण्यात येणाऱ्या या अ‍ॅपविषयी सोमवारी महापालिका आयुक्तांसमोर सादरीकरण करण्यात आले. दरम्यान, ते रिक्षा युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलून अंतिम करणार असल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. येत्या एक आठवड्यात ते अंतिम करण्यात येईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. या अ‍ॅपमुळे महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी तर मिळणार आहेच, शिवाय अधिकृत आणि अनधिकृत रिक्षा किती आहेत, हे समजणार आहे. मागील काही दिवसांत पुन्हा काही विक्षिप्त रिक्षाचालकांकडून महिलांबरोबर गैरवर्तणुकीचे प्रकार वाढले आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून विविध उपाय केले जात आहेत. या प्रकारांना आळा बसावा, म्हणून महापालिकेनही मदतीचा हात पुढे केला होता. रिक्षाचालकांची नोंदणी अत्यावश्यक ठरवून ओला-उबेरप्रमाणे दूरध्वनीवरून रिक्षा बोलवण्याचे अ‍ॅप सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, काही रिक्षाचालकांच्या हेकेखोर युनियनवाल्यांनी या अ‍ॅपला विरोध केला आहे. परंतु, तरीही आयुक्तांनी ते सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा काही रिक्षा युनियनवाल्यांनी हे अ‍ॅप रिक्षाचालकांसाठी धोक्याची घंटा असल्याचा गवागवा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या अ‍ॅपमुळे अनधिकृत रिक्षांना चाप बसून त्या जवळजवळ बंद होणार आहेत.