--------------------------------
चौघांची मारहाण
कल्याण : अकबर शेख हे घरात लहान मुलांसोबत खेळत असताना त्यांच्या घरासमोर सलीम, रोहित, छटकू आणि सोहम गावडे हे दारू पीत होते. त्या वेळी घरात लहान मुले असून, तुम्ही घरासमोर दारू पिऊ नका, असे त्यांना अकबर यांनी सांगितले. त्याचा त्यांना राग आला आणि त्यांनी हॉकी स्टिक आणि हातांनी अकबर यांना मारहाण केली. ही घटना नेतिवली आनंदनगर भागात घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------------
क्षुल्लक कारणावरून मारहाण
कल्याण : ढोल वाजवायला येण्यास नकार दिला म्हणून हर्ष तिवारी याला रूपेश कनोजिया, आकाश माने, राहुल खेडकर, वैभव वाडी आदींनी मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री १० वाजता पूर्वेतील काटेमानिवली परिसरात घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------------------------
लॅपटॉप, मोबाइल लंपास
डोंबिवली : पूर्वेतील खंबाळपाडा परिसरातील विनायक दर्शनमध्ये राहणारे योगेश सिंग यांच्या उघड्या दरवाज्यावाटे चोरट्यांनी आत प्रवेश करून घरातील लॅपटॉप आणि दोन मोबाइल लंपास केले. या प्रकरणी टिळकनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------------------------