शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांचा आज रात्रीपासून बंद

By admin | Updated: May 24, 2017 01:17 IST

ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांच्या विरोधात केलेल्या कारवाईमुळे बुधवारी मध्यरात्रीपासून रिक्षा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांच्या विरोधात केलेल्या कारवाईमुळे बुधवारी मध्यरात्रीपासून रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर आॅटो-टॅक्सी संघर्ष कृती समितीने घेतला आहे. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दिवसभर ठाणेकरांना रिक्षाखेरीज अन्य वाहतूक साधनांवर अवलंबून रहावे लागणार आहे.रिक्षाचालकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा बंद ठेवण्यात येणार असला तरी पालिका आणि रिक्षाचालकांच्या वादात प्रवाशांना नाहक त्रास होणार आहे. रिक्षा चालकांबरोबरच फेरीवालेही संपावर जाणार असल्याचे फेरीवाला संघटनेने स्पष्ट केले आहे.पालिका आयुक्तांनी शहरातील फेरीवाले आणि रिक्षा चालकांवर गेल्या १० ते १२ दिवसांपासून कारवाई सुरु केली आहे. ११ मे रोजी गावदेवी आणि स्टेशन परिसरात झालेल्या कारवाईच्यावेळी रिक्षा युनियनचे नेते राजू सावंत यांच्यासह काही रिक्षाचालकांना मारहाण झाली. आयुक्तांसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी या बेशिस्त रिक्षा चालकांना प्रसाद दिला. यामुळे रिक्षाचालक आणि पालिका प्रशासनामध्ये संघर्ष निर्माण झाला असून पालिका आयुक्तांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय रिक्षा संघटनांनी घेतला आहे. रिक्षा बंद ठेऊन चालक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढणार आहेत. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी नौपाडा येथील जय भगवान हॉलमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक अनंता सावंत यांनी दिली आहे. ठाणे शहर घोडबंदरपासून दूरवर विस्तारले आहे. सकाळी कार्यालय गाठण्याकरिता जाताना व सायंकाळी घरी परतताना ठाणेकरांना टीएमटीच्या सेवेखेरीज केवळ रिक्षाचा पर्याय आहे. अनेकदा टीएमटीच्या बस वाहतूक कोंडीत अडकतात व परिणामी वेळेवर येत नाहीत. बसच्या तुलनेत रिक्षा ही महाग असली तरी जलद स्टेशनवर येण्याकरिता आवश्यक सेवा आहे. बुधवारी रात्रीपासून रिक्षा बंद होणार असल्याने रात्री उशिरा कार्यालयातून परतणाऱ्यांचे तसेच बाहेरगावाकडून येणाऱ्यांचे हाल होणार आहेत. गुरुवारी सकाळपासून रिक्षा रस्त्यावरुन गायब राहिल्या तर कार्यालय गाठणाऱ्यांचे हाल होणार हे निश्चित आहे.