शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालक परस्पर करताहेत प्रवाशांची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 00:37 IST

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर प्रकार; कोरोनाचा कहर रोखणार कसा?

ठाणे : ठाणेमहापालिकेने रेल्वे स्टेशन परिसरात परराज्यातून येणाऱ्या मजुरांची तपासणी सुरू केली आहे. परंतु, या मोहिमेला स्टेशन परिसरातील रिक्षाचालक हरताळ फासत असून प्रवाशांची परस्पर पळवापळव करीत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यात एखादा कोविड पॉझिटिव्ह प्रवासी शहरात घुसला तर कोरोनाचा कहर वाढण्याची भीती आहे.कोरोनाला अटकाव करण्यासाठी महापालिकेने ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची चाचणी करण्याची मोहीम गेल्या दोन महिन्यांपासून हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत २८ हजार ९३८ प्रवाशांची कोविड टेस्ट केली आहे. त्यापैकी १७६ प्रवासी बाधित सापडले असून, तत्काळ उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या मोहिमेमुळे कोरोनाची ‘एण्ट्री’ रोखण्यात यश येत असताना काही मुजोर रिक्षाचालकांमुळे या मोहिमला खो घातला जात आहे.कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी रिक्षाचालक थेट स्थानकातील फलाटावर येऊन प्रवासी पळवत होते. आता तर त्यांनी सॅटिसवरही मजल मारली आहे. सॅटिसवर व त्याखाली जिथे कोविड टेस्ट केंद्र कार्यान्वित आहे तेथे ते गिरट्या मारताना दिसतात. रोज हजारो चाचण्या होत असल्यामुळे दुपारी दीड ते दोनच्या सुमारास स्थानक परिसरात प्रवाशांची भली मोठी रांग लागते. ती चुकविण्यासाठी काही प्रवासी प्रयत्न करताना दिसतात. या प्रवाशांना इशारेबाजी करीत हे रिक्षाचालक हळूच रांगेबाहेर काढून रिक्षात सुसाट दामटवतात. मनपाच्या सुरक्षारक्षकांचे पथकही या कारनाम्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे.काहींना पकडले रंगेहाथरविवारी हा प्रकार उघडकीस येताच रिक्षा युनियनचे रवींद्र राऊत यांनी काही रिक्षाचालकांना रंगेहाथ पकडले होते. या वेळी स्थानक परिसरात मोठा हंगामा झाला होता. यामुळे आता कोविड चाचणी केंद्राजवळ सुरक्षेसाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.