शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालक आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:49 IST

कल्याण पूर्वेतील नांदिवली येथील आरटीओच्या ट्रॅकवर सध्या वाहनांच्या पासिंगला विलंब होत असल्याने त्याचा फटका चालकांना बसत आहे.

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील नांदिवली येथील आरटीओच्या ट्रॅकवर सध्या वाहनांच्या पासिंगला विलंब होत असल्याने त्याचा फटका चालकांना बसत आहे. हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांना एका फेरीत काम न झाल्यास पुन्हा तेथे जावे लागते. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडत आहे. त्याच्या निषेधार्थ डोंबिवलीतील रिक्षाचालक-मालक युनियन लवकरच आंदोलन छेडणार आहे.वाहनतपासणी आणि पासिंगसाठी आरटीओला कल्याण पश्चिमेतील आधारवाडीनजीकची जागा अपुरी पडत होती. त्यामुळे पूर्वेला नांदिवली येथील नव्या जागेत टेस्टिंग ट्रॅक उभारण्यात आला. मात्र, सध्या पावसामुळे तेथे तांत्रिक अडचणी येत आहेत. व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग, पॅनिक मशीनची अंमलबजावणी संथगतीने होत आहे. त्यामुळे पासिंगसाठी तासन्तास थांबावे लागत आहे. पहिल्या दिवशी वाहनांचे पासिंग न झाल्यास दुसऱ्या, तिसºया दिवशीही यावे लागत आहे. परिणामी, वाहनचालक जेरीस आले आहेत.यासंदर्भात युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी म्हणाले की, वाहनचालकांना तेथे वेठीस धरले जात आहे. अनेकदा यासंदर्भात आरटीओ अधिकाऱ्यांना सांगूनही परिस्थितीत सुधारणा होत नाही. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांचा दिवसाचा खाडा होतो. तेथे जायचे आणि तासन्तास वाट बघायची, ताटकळत बसायचे, यात त्यांचा वेळ जातो. त्यामुळे यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. पावसाच्या दिवसांत तेथे वाहनात किती वेळ बसणार, तसेच तेथे अन्यत्र आसरा घेण्याची सुविधा नाही. त्यामुळे वाहने आली की कामे झटपट व्हावीत, वाहनचालकांना वेगवान यंत्रप्रणाली राबवून दिलासा द्यावा, अशा मागण्यांसाठी लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य वाहनचालकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.>पत्राला केराची टोपली?आरटीओ अधिकाºयांना या प्रश्नासंदर्भात आम्ही २५ जूनला पत्र दिले आहे. मात्र, अद्यापही परिस्थितीत कोणतीच सुुधारणा झालेली नाही. त्यामुळे आमच्या पत्राला केराची टोपली दाखवली का? रिक्षाचालकांसह सामान्य चालकांच्या समस्यांना कोणी वाली आहे की नाही? असा सवाल जोशी यांनी केला आहे.