शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बुलेटच्या धडकेने रिक्षा उलटली, रिक्षाचालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST

अंबरनाथ : भरघाव जाणाऱ्या बुलेटस्वाराने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा उलटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत रिक्षाचालक जखमी ...

अंबरनाथ : भरघाव जाणाऱ्या बुलेटस्वाराने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा उलटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत रिक्षाचालक जखमी झाला आहे. मात्र, या अपघातानंतर बुलेटस्वार पळून गेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पूर्वेतील कैलासनगर परिसरातील हिंदू स्मशानभूमीजवळील चौकातून भावेश भोपी (१९) हा रिक्षाचालक त्याच्या रिक्षाने उल्हासनगरच्या दिशेने जात होता. याच सुमारास लोकनगरीकडून भरघाव एक बुलेटस्वार येत होता, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने सरळ रिक्षाला धडक दिली. यामुळे रिक्षा उलटल्याने भावेश याचा उजवा पाय रिक्षाखाली दाबला गेला. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी रिक्षाला सरळ करून जखमी भावेशला बाहेर काढले.

या घटनेनंतर बुलेटस्वार पळून गेला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भावेशने दिलेल्या बुलेटच्या नंबरवरून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी आरोपीचा शोध घेत आहेत.

------------