शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाची प्रवाशाला मारहाण

By admin | Updated: February 16, 2017 02:03 IST

भिवंडीत रिक्षाचालकाने एसटी बसचालकाला, तर ठाण्यात प्रवाशाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीतही

डोंबिवली : भिवंडीत रिक्षाचालकाने एसटी बसचालकाला, तर ठाण्यात प्रवाशाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीतही रिक्षाचालकाने एका प्रवाशाला मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात घडली. वाहतूक पोलिसांना तो रिक्षाचालक सापडला, पण तक्रार नसल्याने कारवाई कशी करायची, असा सवाल पोलिसांनी केला. अखेर, त्या रिक्षाचालकाला केवळ तोंडी समज देण्यात आली.इंदिरा गांधी चौकातून लोढा, मानपाडा, शनी मंदिर, काटई आदी परिसरांत जाणाऱ्या रिक्षा सुटतात. रिक्षाचालकांनी इंदिरा गांधी चौकातील पनवेल एसटी बसथांबा बळकावत तेथे रिक्षांचे बेकायदा स्टॅण्ड सुरू केले आहे. या स्टॅण्डवर बुधवारी मानपाडा येथे जाण्यासाठी आलेला एक प्रवासी आणि रिक्षाचालकामध्ये बाचाबाची झाली. त्याचा राग आल्याने रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण केली. या वेळी अन्य रिक्षाचालकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. अन्य एका प्रवाशाने मध्यस्थी करत भांडण सोडवले. या घटनेची माहिती वाहतूक पोलीस सागर दिवटे, वॉर्डन निलेश झेमसे, राजेश शहाणे यांना माहिती मिळताच त्यांनी चालकाला शोधले. परंतु, तक्रार नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकाला समज देऊन सोडून देण्याचा तोंडी आदेश दिला. त्यामुळे चालकाला सोडून द्यावे लागल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)