शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालकाची तरुणीस मारहाण

By admin | Updated: July 7, 2017 21:52 IST

आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी रिक्षा न नेल्यामुळे संतापलेल्या एका १९ वर्षीय प्रवासी तरुणीने महेंद्र अरुण पितळे (४९, रा. आझादनगर, कॅसलमिल, ठाणे) या रिक्षा चालकाशी

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 07 - आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी रिक्षा न नेल्यामुळे संतापलेल्या एका १९ वर्षीय प्रवासी तरुणीने महेंद्र अरुण पितळे (४९, रा. आझादनगर, कॅसलमिल, ठाणे) या रिक्षा चालकाशी वाद घातला. याच वादातून त्याने तिला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. दरम्यान, त्या तरुणीनेही आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पितळे यानेही ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली.खोपट भागातून जाणाऱ्या पितळे याच्या शेअर रिक्षात ही तरुणी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास बसली. खोपटच्या चौकातून तिने चरईला रिक्षा नेण्याचा आग्रह धरला. त्याने मात्र रिक्षा टेंभीनाका मार्गे जाईल, असे स्पष्ट केले. तिला दगडी शाळेकडे जायचे असल्यामुळे त्यांच्यात याच कारणावरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे त्याने तिला मूस चौकात मारहाण केली. यातून चवताळल्यामुळे तिनेही त्याला मारहाण केली. अखेर प्रकरण ठाणेनगर पोलीस ठाण्यात आल्यानंतर मुलीने आधी मारहाण केल्यानंतर आपणही तिला मारल्याचा रिक्षा चालकाने दावा केला. तर त्यानेच आपल्याला मारहाण केल्याची उलट तक्रार या तरुणीने पोलिसांना दिली. मुळात, या मुलीने जो मार्ग दाखविला होता, तो ‘नो एन्ट्री’चा होता. त्यामुळेच रिक्षा त्या मार्गाने जाऊ शकत नव्हती, असेही पितळे याने स्पष्ट केले. पोलिसांनी अखेर दोघांच्याविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार नोंदविली असून साधी अदखलपात्र तक्रार असल्यामुळे कोणालाही अटक केलेली नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.रिक्षा चालकांची वाढती आरेरावी...राबोडीच्या शिवाजीनगर येथील सिकंदर शेख या रिक्षाचालकानेही नौपाड्यातील २५ वर्षीय तरुणीला अलोक हॉटेलच्या जवळ बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नजरेने इशारा करून विनयभंग केला. तिने याचा जाब विचारत त्याच्या श्रीमुखात लगावली होती. त्यानेही चुक कबूल करण्याऐवजी त्या तरुणीलाच जबर मारहाण केली. याप्रकरणी मारहाण आणि विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर शेखला पोलिसांनी अटक केली. अवघ्या एकच दिवसाच्या अंतरावर पुन्हा तरुणीला मारहाणीचा प्रकार घडल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.