शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा संघटनेमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:20 IST

अध्यक्ष पाटील की यादव? : दोघेही शिवसेनेचेच पदाधिकारी

उल्हासनगर : शहरातील शहीद मारोती जाधव रिक्षाचालक-मालक संघटनेचा वाद चव्हाट्यावर आला आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी राजा पाटील की शेखर यादव, असा वाद रंगला असून लोकशाही मार्गाने निवडणूक घेऊन अध्यक्षपदी निवडून आल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.रिक्षाचालक-मालक संघटनेचा शहरात दबदबा असून शेकडो रिक्षाचालक संघटनेचे सदस्य आहेत. अनेक वर्षांपासून संघटनेतील दोन गट आमने-सामने उभे ठाकले आहेत. पाटील शाखाप्रमुख तर यादव नगरसेवक आहेत. दोन्ही पदाधिकारी शिवसेनेचे असून दोघांत दिलजमाई करण्यास स्थानिक नेत्यांसह वरिष्ठ नेते अपयशी ठरले आहेत. पाटील यांनी १ एप्रिलला स्वामी शांतिप्रकाश सभागृहात रिक्षाचालक-मालकांची सर्वसाधारण सभा बोलावून अध्यक्षपदासह इतर कार्यकारिणीची चर्चा केली. तर, २० एप्रिलला अध्यक्षांसह कार्यकारिणीची निवडणूक होऊन लोकशाही पद्धतीने पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली.पाटील यांनी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करून कामगार आयुक्तांसह पोलीस उपायुक्त, संबंधित पोलीस ठाणे यांना तशी प्रत दिली. तसेच ३५० पेक्षा जास्त रिक्षाचालक-मालकांची सदस्ययादी व त्यांची सदस्यपावती दिली. या प्रकाराने संघटनेचे प्रमुख व नगरसेवक यादव यांनी घाईगडबडीत रविवारी दुपारी १ वाजता लालचक्की चौकातील वाघमारे हॉलमध्ये रिक्षाचालक-मालकांची सर्वसाधारण बैठक बोलावली. बैठकीला चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी बैठकीनंतर यादव यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. एकाच संघटनेचे दोन अध्यक्ष झाल्याने संघटनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.लोकशाही पद्धतीने निवड करावीशेखर यादव हे माझे चांगले मित्र असून आम्ही दोघेही एकाच पक्षात काम करतो. बहुतांश रिक्षाचालक-मालक संघटनेचा पाठिंबा मला असून ३५० पेक्षा जास्त रिक्षाचालक-मालकांनी संघटनेच्या अधिकृत सदस्यपदाच्या पावत्या फाडल्या आहेत, असा दावा त्यांनी केला. शहीद मारोती जाधव रिक्षा संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व असून अध्यक्षपदाची निवड लोकशाही पद्धतीने होते. कोणत्याही संघटनेचा पदाधिकारी येथे येऊन थेट अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देत नाही, अशी माहिती पाटील यांनी दिली. संघटना व रिक्षाचालकांच्या हितासाठी सदैव लढणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे