शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

हंगामी भातशेतीसाठी भातसाचे पाणी

By admin | Updated: November 16, 2015 02:04 IST

भातसा कालव्याचे पाणी २०१५-१६ च्या सिंचन हंगामात शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

वासिंद : भातसा कालव्याचे पाणी २०१५-१६ च्या सिंचन हंगामात शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.भातसा धरणातून वसईकडे गेलेल्या भातसा उजव्या कालव्याद्वारे किमी २ ते ५४ दरम्यानच्या शेतकऱ्यांना हंगामी स्वरूपात भातशेती व भाजीपाला करण्याकरिता दरवर्षी पाणी सोडले जाते. या वर्षी पाऊस कमी पडल्याने ते सोडले जाणार नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली होती. त्यामुळे हंगाम लागवडीसह वीटभट्टी व्यावसायिक, या पाण्यावर अवलंबित छोटे धंदेवाईक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, या वर्षी कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशा प्रकारच्या कुठल्याही नोटिसा बजावल्या नसून ते शेतीसाठी उपलब्ध केले जाणार आहे.दरम्यान, या उजव्या कालव्यांतर्गत ५५ गावपाडे ओलिताखाली असून १४९० हेक्टर लागवड क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. तसेच गेल्या तीन-चार वर्षांपासून कालव्याची दुरुस्ती व साफसफाईची कामे झालेली नाहीत. त्यामुळे पाण्याची वहनक्षमता कमी झाली असून ठिकठिकाणी कालव्याला गळतीचे प्रमाण अधिक आहे. याबाबत, शेतकऱ्यांची नाराजी असून पाणीगळती रोखणे व कालव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने याकडे लक्ष वेधावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. त्याबाबत पाटबंधारे खाते काय करते, याकडे लक्ष लागले आहे.