शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

महिला भवनवर महसूलचा डोळा, आर्थिक चणचणीतही कवडीमोल भावाने भाडेतत्त्वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 03:40 IST

आर्थिक चणचणीमुळे केडीएमसीमधील विकासकामांना खीळ बसली असताना दुसरीकडे आपल्या मोक्याच्या जागा कवडीमोल भावात महसूल आणि पोलीस विभागाला देण्याचा प्रताप सुरूच आहे.

कल्याण : आर्थिक चणचणीमुळे केडीएमसीमधील विकासकामांना खीळ बसली असताना दुसरीकडे आपल्या मोक्याच्या जागा कवडीमोल भावात महसूल आणि पोलीस विभागाला देण्याचा प्रताप सुरूच आहे. सर्वाेदय मॉल येथे महापालिकेतर्फे स्मार्ट सिटीचे कार्यालय थाटण्यात येणार आहे. त्यामुळे मॉलमधील महसूल विभागाच्या निवडणूक कार्यालयासाठी महापालिकेच्या कचोरे येथील महिला भवनच्या जागेची मागणी केली जाते आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाले असून यावर महापालिका कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.केडीएमसीच्या अनेक मालमत्ता या सध्या पोलीस आणि महसूल विभागाच्या ताब्यात आहेत. महापालिका त्यांच्याकडून कवडीमोल भावाने भाडे आकारत आहे. ते अत्यल्प भाडेही महापालिकेला मिळत नाही. याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी झालेल्या महासभेत जागा भाडेतत्त्वावर दिलेला मुद्दा चांगलाच गाजला होता. त्या वेळी नगरसेवक दीपेश म्हात्रे, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, नगरसेविका शालिनी वायले व अन्य नगरसेवकांनी प्रशासनावर चांगलीच झोड उठवली होती.सर्वसामान्यांकडून कर गोळा करता, मग पोलीस आणि महसूल विभागावर मेहरबानी का, असा सवाल करण्यात आला होता. महापालिकेला उत्पन्न मिळवण्याकडे जे दुर्लक्ष झाले, त्याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली होती.सध्या खडकपाडा येथील मोहन प्राइड इमारतीत पहिल्या मजल्यावर निवडणूक कार्यालय आहे. तिथेच उपविभागीय कार्यालय आहे. तळ मजल्यावर पोलीस उपायुक्तांचे कार्यालय आणि पोलीस नियंत्रण कक्ष आहे. या जागाही महापालिकेने भाडेतत्त्वावर कवडीमोल भावाने महसूल आणि पोलीस विभागाला दिल्या आहेत. डोंबिवलीत टिळकनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्यांसाठीही महापालिकेने जागा दिल्या आहेत. या जागा देऊ नका, म्हणूनही वाद झाले होते. कल्याण दूधनाका येथील जागा मतदारयाद्या बनवण्यासाठी देण्यात आली होती. हे काम संपुष्टात आल्यानंतरही या जागेचा ताबा महापालिकेकडे अद्यापही देण्यात आलेला नाही. याउपरही महसूल विभागाकडून जागा मागण्याचा सपाटा सुरूच आहे.सर्वाेदय मॉलमधील महापालिकेच्या जागेत महसूल विभागाचे निवडणूक कार्यालय आहे. मात्र, तेथे केडीएमसीचे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यालय येणार आहे. त्यामुळे येथून निवडणूक कार्यालयाला गाशा गुंडाळावा लागणार आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्रव्यवहार करून कचोरे येथील महिला भवनच्या जागेची मागणी केली आहे. महिला व बालकल्याण विभागाचे हे महिला भवन आहे. याबाबत, संबंधित विभागाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. मालमत्ता विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी जागा संबंधित विभागाला द्यायची की नाही, याबाबत योग्य ती पडताळणी करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.>उत्पन्नाच्या बाबींकडे दुर्लक्षज्या मालमत्तांमधून लाखोंचे उत्पन्न मिळू शकते, अशा मालमत्ता कोणाच्या दबावाखाली किंवा सरकारमधील कोणाला तरी खूश करण्यासाठी कवडीमोल भावाने दिल्या जात आहेत.आधीच भिकेचे डोहाळे लागले असतानाही महापालिकेला जाग येत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. उत्पन्नाच्या बाबींकडे पुरते दुर्लक्ष झाले असून यात प्रशासनाबरोबरच सत्ताधारी निष्क्रि य ठरल्याचे मत विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी व्यक्त केले.