शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘पैसे परत द्या; अन्यथा प्रचारसभेत जाळून घेईन’

By admin | Updated: February 15, 2017 04:40 IST

उमेदवारीसाठी पैसे मागितल्याचे एमआयएममधील प्रकरण निवडणुकीच्या तोंडावर चिघळले असून उमेदवारीसाठी घेतलेले पैसे परत द्या;

मुंब्रा : उमेदवारीसाठी पैसे मागितल्याचे एमआयएममधील प्रकरण निवडणुकीच्या तोंडावर चिघळले असून उमेदवारीसाठी घेतलेले पैसे परत द्या; अन्यथा पक्षाच्या प्रचारसभेत जाळून घेईन, असा इशारा पक्षाचे माजी स्थानिक नेते ताजुद्दीन युनूस खान यांनी पत्रकार परिषदेत दिला.मुस्लिम समाजात हरामचे पैसे घेण्यास परवानगी नाही. मात्र मुस्लिमांसाठी काम करतो, असे सांगणाऱ्या एमआयएम या पक्षाने उमेदवारांकडून २०-२० लाख उकळले. उमेदवारीच्या नावे पक्षाचे नेते खंडणी मागत आहेत. माझ्याकडूनही त्यांनी उमेदवारीसाठी २० लाखांची मागणी करत प्रत्यक्षात पाच लाख घेतल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या पक्षापासून मतदारांनी दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या प्रकरणी एमआयएमच्या त्या पुढाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली. याची स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देत संबंधितांना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या आरोपांवर एमआयएमने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ताजुद्दीन हे एमआयएमचे मुंब्रा येथील उमेदवार होते. एमआयएमचे पदाधिकारी असतानाही पक्षाच्या हैदराबाद येथील नेत्यांनी त्यांच्याकडे उमेदवारीसाठी २५ लाख मागितले होते. मात्र ताजुद्दीन यांनी पाच लाख दिल्याचा त्यांचा दावा आहे. आणखी २० हजार देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविल्याने पक्षाने अन्य उमेदवाराला २० लाखांत दिल्याचा आरोप ते करत आहेत. एमआयएम हा पक्ष मुस्लिम हितासाठी काम करीत नाही. धर्मात कोणाकडूनही असे अवैधरित्या पैसे घेण्यास मनाई असतानाही पक्षाचे नेते हे कृत्य करत आहेत. त्यामुळे समाज बदनाम होत आहे. म्हणून मी त्या पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा दावाही त्यांनी केला. हैदराबादच्या त्या नेत्यांकडून माझे पाच लाख रु पये पोलिसांनी परत मिळवून द्यावे आणि त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. माझे पाच लाख रु पये परत दिले नाहीत, तर एमएआयएमच्या प्रचाराच्या सभेत मी रॉकेल ओतून पेटवून घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)