शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राज्य नाट्यस्पर्धेचा निकाल गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 03:26 IST

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कलासंचालनालयाच्या नाट्य विभागातर्फे पार पडलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धच्या प्राथमिक फेरीचा कल्याण केंद्राचा निकाल अद्यापही लागलेला नाही.

प्रशांत माने कल्याण : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कलासंचालनालयाच्या नाट्य विभागातर्फे पार पडलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धच्या प्राथमिक फेरीचा कल्याण केंद्राचा निकाल अद्यापही लागलेला नाही. स्पर्धा होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटल्यावरही निकाल जाहीर न होण्यामागे गौडबंगाल काय? असा प्रश्न स्पर्धेतील सहभागी हौशी नाट्यसंस्थांना पडला आहे. स्पर्धा संपली, की लागलीच दुसºया दिवशी निकाल दिला जातो. परंतु निकाल इतक्या विलंबाने लागणे आजवरच्या इतिहासात कधीच घडलेले नाही, अशी मते जाणकारांकडून व्यक्त होत आहेत.महाराष्ट्र राज्य नाट्य विभागातर्फे संपूर्ण राज्यभरात २५ ते २६ ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण केंद्रावरील स्पर्धा ६ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत २४ हौशी नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला होता. नेहमी या स्पर्धा कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पार पडतात. परंतु डागडुजीच्या कामासाठी ते रंगमंदिर बंद असल्याने या स्पर्धा डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले कलामंदिरात घेण्यात आल्या. स्पर्धा संपली की त्या रात्रीच निकालाचे काम परीक्षकांकडून पूर्ण केले जाते आणि तो निकाल सीलबंद पध्दतीने केंद्र समन्वयाकडे दिला जातो. समन्वयकाकडून तो सांस्कृतिक संचालनालयाकडे पाठवला जातो. मग संबंधित कला संचालनालय कार्यालयाकडून निकाल जाहीर केला जातो. ही प्रक्रिया साधारण दोन दिवस चालते. परंतु आजमितीला आठ दिवसांचा कालावधी उलटूनही निकाल जाहीर झालेला नाही. राज्यातील इतर केंद्रावरील निकाल जाहीर झाला असताना कल्याण केंद्रावरील निकालाला विलंब का? असा सवाल उपस्थित होत आहे. कल्याण केंद्राच्या समन्वयकांकडूनही योग्य प्रकारे उत्तरे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.>अंतिम स्पर्धेसाठीतयारी कशी करायची?राज्य नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडल्यानंतर यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक म्हणून तीन नाटके निवडली जातात. याचबरोबर उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रकाशन, अभिनय म्हणूनही गौरविण्यात येते. प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावलेली दोन नाटके अंतिम फेरीसाठी पाठविली जातात. ही स्पर्धा साधारण जानेवारी महिन्यात होते. परंतु कल्याण केंद्राचा निकाल जाहीर न झाल्याने नेमका प्रथम आणि द्वितीय क्रमांक कोणाला मिळाला आहे, याची माहिती मिळालेली नाही. अंतिम स्पर्धेची तारीखही जवळ आल्याने त्या स्पर्धेसाठी तयारी करायची की नाही व ती कशी, असा यक्षप्रश्नही सहभागी स्पर्धकांना पडला आहे.>‘असे कधीच घडले नाही’ : आजवरचा इतिहास पाहता स्पर्धा संपताच दुसºया किंवा तिसºया दिवशी निकाल दिला जातो. परंतु कल्याण केंद्राचा निकाल तब्बल आठ दिवस उलटूनही लागत नाही हे चुकीचे आहे. सहभागी नाट्यसंस्था आतुरतेने निकालाची वाट पाहात आहेत. विलंब का होतोय याबाबत संबंधित सांस्कृतिक कलासंचालनालयाने तातडीने माहिती द्यावी, असे मत नाट्य परिषद कल्याण शाखेचे उपाध्यक्ष सुरेश पवार यांनी व्यक्त केले.>‘निकाल त्या दिवशीच पाठविला’ : यासंदर्भात केंद्र समन्वयक सुधीर रोकडे यांच्याशी संपर्क साधला असता, माझी जबाबदारी ही केंद्र समन्वयक म्हणून होती. ज्या दिवशी स्पर्धा पार पडली त्यादिवशीच परीक्षकांकडून निकाल घेऊन तो सीलबंद अवस्थेत सांस्कृतिक कलासंचालनालयाकडे पाठविला आहे. निकाल जाहीर करायला विलंब का लागला, याबाबत मी काहीही सांगू शकत नाही असे ते म्हणाले.

टॅग्स :kalyanकल्याण