शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मॉलमुळे पुस्तकविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:50 IST

यंदा जेमतेम ३०-४० टक्के व्यवसाय

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर शालेय उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाते. परंतु, मॉलमध्ये या वस्तूंची खरेदी करण्याकडे अनेक ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर पाणी फिरले आहे. यंदा ३० ते ४० टक्केच व्यवसाय झाला आहे, अशी माहिती बुक सेलर असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रेय माळी यांनी दिली आहे.माळी म्हणाले, शाळांमधून शालेय उपयोगी साहित्य देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीनचार वर्षांपासून त्याचा फटका आमच्या व्यवसायाला बसतच होता. तसेच मॉलमध्ये वस्तूंच्या खरेदीवर २५ टक्क्यांची सूट देण्यात येत होती. त्यामुळे ग्राहकांचा कल हा मॉलमध्ये खरेदी करण्याकडे यंदा जास्त होता. छोट्या व्यावसायिकांचा यामुळे ३० ते ४० टक्के व्यवसाय कमी झाला.बुक सेलर असोसिएशनमध्ये डोंबिवलीत २१६, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर येथील १४०, भिवंडीतील १० आणि दिव्यातील १५ विके्रते आहेत. या सर्व विक्रेत्यांना यंदा व्यवसाय कमी झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी शालेय वस्तूंची उलाढाल ही पाच कोटींची झाली होती. यंदाच्या वर्षी ती कमी होऊन पावणेतीन कोटींवर गेली आहे. आम्ही छोटे विक्रेते असलो, तरीही ग्राहकांना १० टक्के सूट देतो. पहिली ते नववीपर्यंतच्या शालेय वस्तूंच्या खरेदीला फटका बसल्याचे दिसून येत आहे. आता अकरावीची पुस्तके बाजारात येणे बाकी आहे. या पुस्तकांमुळे व्यवसायात थोडीफार भर पडेल, अशी आशा व्यावसायिकांना आहे. आमचा वर्कबुकचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे. वर्कबुकही शाळेतून दिली जातात. त्यामुळे त्यांचाही ९० टक्के व्यवसाय कमी झाला आहे. शाळांमधून शालेय साहित्य दिले जाते, पण त्यावर कोणतीही सूट दिली जात नाही. पण, पालकांना शाळेतून खरेदी करावे लागते. या सर्वांमुळे छोट्या व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे, असे ते पुढे म्हणाले.शाळाही पुरवतात शालेय वस्तूएका पुस्तकविक्रेत्याने सांगितले, यंदाच्या वर्षी आमचा व्यवसाय कमी झाला. सुरुवातीला ही समस्या एका पुस्तकविक्रेत्यापुरती मर्यादित असल्याचे वाटत होते. परंतु, संघटनेतील इतर विक्रेत्यांशी चर्चा केल्यानंतर व्यवसाय कमी होण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मॉलमधून वाढती खरेदी याबरोबरच शाळाही दरवर्षी विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवत असल्याचे आढळून आले. त्यामुळे व्यवसायास फटका बसत आहे. परिणामी, यंदाच्या वर्षी शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी नेहमीसारखी गर्दी दुकानांमध्ये झाली नाही.